आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा : 12 जानेवारी पासून बेमुदत राज्यव्यापी संप

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

         राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या होत्या.

       संपाच्या पार्श्वभूमीवर अप्पर सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,आयुक्त,आरोग्य सेवा तसेच मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याबरोबर बैठकी होऊन चर्चा झाल्या.

         वरीप्रमाणे झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दोन हजार रुपये भाऊबीज देण्यासह आशा स्वयंसेविकांना ७०००/- तर गट प्रवर्तकांना १००००/- रुपये मानधनवाढ करण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दि.०१ नोव्हेंबर२०२३ रोजी केली.परंतू घोषणेनुसर आजपावेतो त्याच्या शासकिय आदेश निघालेला नाही.

           म्हणून मा.आरोग्य मंत्र्यानी केलेल्या घोषणेप्रमाणे भाऊबीज भेट आणि मानधनवाढीचा शासकीय आदेश(GR) तात्काळ काढावा.यासाठी राज्यासह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक दि.१२ जानेवारी २०२४ पासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत.असे निवेदन रावेर तालुक्यातील आशा स्वयंसेवीका व गट प्रवर्तक यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अजय रिंढे यांना दिले आहे

  सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी संपात सहभागी होवून संप यशस्वी करावा असे आवाहन मायाताई परमेश्वर, युवराज बैसाने,रामकृष्ण बी.पाटील, सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे यांनी केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️