जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह यांनी १८ ते २ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.[ads id="ads1"]
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती पंधरवडा १८ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. या योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यमातून गोळा करणे, ते ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पोर्टल भरणे, माहिती देणे आणि प्रचार करणे आदी नियोजन करण्यात येणार आहे. सर्व महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था व अशासकीय संस्था येथे योजनेचे जनजागृती मेळावे, प्रचार व प्रसिध्दी आयोजित करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवर भरुन घेण्याची कार्यवाही करावी. तसेच उद्योजकता प्रशिक्षण देणा-या संस्था जसे की महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, आरसेटी या संस्थाकडील प्रशिक्षित तरुण-तरुणींची यादी घेवुन त्यांना योजनेची माहिती द्यावी. महिला मेळावे घेणे ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गट यांना संपर्क साधुन महिलांना या योजनेत प्राधान्याने सहभागी होण्यासाठी कृती आराखडा तयार करुन काम करणे. जिल्हयातील सर्व महामंडळे आणि एनजीओ यांना संपर्क साधून लाभार्थी योजनेत सहभागी करुन घेणे.[ads id="ads2"]
एक बँक - एक प्रकरण यासाठी बँक मॅनेजर यांनी संपर्क साधुन योजनेत सहभाग वाढविणे. एक गाव किमान एक प्रकरण या प्रमाणे काम करणे. एक जिल्हा एक वस्तु याप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना प्राधान्य देणे. औद्योगिक समुह योजनेतील लाभार्थीना लाभ देणे. मासिक त्रैमासिक मिटींगसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित करणे व विस्तृत पाठपुरावा/समन्वय करणे, बँकेत प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करुन जास्तीत जास्त प्रकरणे मंजुर करुन घेणे.
जिल्हा उद्योग केंद्रात नाशिक विभाग उद्योग सहसंचालक सतीष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थितक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, जिल्हा विकास ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक व कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे अधिकारी उपस्थिित होते. या बैठकीत जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजुर करुन घेवुन वाटपाची कार्यवाही करावी. नवउद्योजकांनी सदर पंधरवाडयात सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन श्री.शेळके यांनी केले.
सदर योजनेची अधिक माहितीसाठी जळगांव जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन महाव्यवस्थापक चेतन पाटील व व्यवस्थापक आर.आर.डोंगरे यांनी केले आहे.