यावल (सुरेश पाटील) तालुक्यात केळी पिक विमा योजनेअंतर्गत संबंधित काही दलाल,काही मध्यस्थी यंत्रणेने शासकीय यंत्रणेची,विमा कंपनीची शुद्ध दिशाभूल व फसवणूक करीत अनेक शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा बेकायदा उद्योग केला आहे.
याबाबत ग्रामीण भागात किनगाव,डांभुर्णी,आडगाव, साकळी,शिरसाड,डोंगरकठोरा,चितोडा,हिंगोना,हब्बर्डी,अमोदा,यावल,कोळवद,अट्रावल,भालोद, बामनोद सांगवी,इत्यादी अनेक गावांमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून काही संबंधित दलाल शेतकऱ्यांशी संपर्क,समन्वय साधून त्यांना काही रकमा देऊन तडजोडी करीत असल्याचे त्याच्या नावासह समोर आले आहे.त्यात बेकायदा,अनाधिकृत ज्यांच्या शेतात प्रत्यक्ष केळी नसताना लाभ मिळाला अशांवर लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे आणि प्रत्यक्ष ज्यांच्या शेतात केळी भागाची लागवड झालेली असताना ज्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads1"]
नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे शेतकऱ्यांना बाजारातील नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.फळपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हातबल व निराश होतो,अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपिक विमा योजना मोलाचं काम करणार तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी हा फळपिक विमा योजनेचा मुख्य उद्देश होता आणि आहे.[ads id="ads2"]
परंतु केळी पिक योजना राबविताना संबंधित यंत्रणेच्या नावाखाली काही मध्यस्थी आणि दलालांनी शेतकऱ्यांची संपर्क साधून विमा मंजूर करून देईल,विमा मंजूर करून आणून देईल इत्यादी कारणे सांगून अनेक शेतकऱ्यांकडून प्रति हेक्टरी ठराविक रकमा घेऊन केळी पिक विमा मंजूर करून दिला आहे.तसेच काही केळी उत्पादक शेतकऱ्यांना न सांगता त्यांच्या नावावर बोगस दस्तऐवज तयार करून केळी पिक विमा मंजूर करून घेतले. मंजूर यादीत शेतकऱ्यांना आपल्या नावावर केळी पिक विमा मंजूर झाल्याचे समजल्याने तालुक्यात मोठा कोट्यावधी रुपयाचा केळी पीक विमा घोटाळा झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात असल्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी संबंधित काही मध्यस्थी दलालांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर केळी पिक विमा काढून घेतला आहे त्या शेतकऱ्यांनी तक्रारी करू नये म्हणून मध्यस्थी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही ठराविक रकमा देऊन समन्वय साधून गप्प बसवीत आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष केळी लागवड असताना त्यांना केळी पीक विमा मिळाला नाही त्यांच्या तक्रारी सुद्धा वाढल्याने तालुक्यात केळी पिक विमा योजनेअंतर्गत मोठा घोळ आणि घोटाळा झाला असल्याची सुद्धा यावल तालुक्यातील शेतकरी वर्गात, राजकारणात समाजात बोलले जात आहे.वरील गावांमधील अनेक शेतकऱ्यांच्या नावावर केळी पिक विमा कसा काढला..? त्यांच्या नावानिशी यादी तयार झाली असून लवकरच याबाबत फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
अट्रावल येथील जागृत व संपूर्ण खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध अशा मुंजोबा परिसरातील चौधरी,महाजन,वा..र.. वर्तुळातील गटा बाबत आणि त्यांच्या कृत्याबाबत सर्व संपूर्ण यावल तालुक्यात मोठा घोटाळा उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय प्रभावामुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या नावावर केळी पिक विम्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची रक्कम हडप करणाऱ्यांकडे गेल्या वर्ष 2 वर्षात चार चाकी वाहने,एक ते दीड लाखापर्यंतचा मोबाईल आणि परदेशात दौरा करण्याइतपत मोठी रक्कम आली कुठून..? याबाबत सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.