तथागत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांचा प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा..


बुलढाणा :- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने खालील मागण्याकरिता तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी प्रशासनाला इशारा दिला जर आठ दिवसात खालील मुद्यावर कार्यवाही नाही झाल्यास मेहकर तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येईल याकरिता खालील विविध मागण्यासाठी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी साहेब, तहसिलदार साहेब, मुख्य आधिकारी साहेब नगर परिषद, उपविभागीय पोलीस आधिकारी साहेब, पोलीस निरिक्षक साहेब, पोलीस स्टेशन मेहकर यांना मागील काही दिवसापुर्वी निवेदन देऊन त्यांचा आढावा घेण्यात आला या मुद्यावर प्रशासन झोपेच सोंग घेत आहे. व जनतेच्या व युवकांच्या तसेच शेतकर्यांच्या जिवाशी खेळत आहे प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे तरी ही प्रशासन व स्थानिक नेतेमंडळी या प्रश्नानकडे दुर्लक्ष करत आहे.[ads id="ads1"]

  याकरिता तथागत ग्रुपच्या वतीने  खालील मागण्याकरिता

1) मेहकर भाग -1 गट नं 21/1अ व जामगाव गट नं 53,37,58 चे ले - आऊट ग्रिन झोन मध्ये असुन उपविभागीय अधिकारी ह्यानी बोगस NAP/34 करुन दीले असुन ह्या अधिकाऱ्यावर चौकशी करण्यात यावी.

2) मेहकर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलेले असून मंत्र्यांच्या आदेशानंतर ही अधिकाऱ्यांनी ते हटविले नसून त्या अधिकारी व एमआयडीसी भुखंड हडप करणार्यावर कार्यवाही करण्यात यावी.

3) मेहकर व लोणार उपविभागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे यामुळे तरुन युवा पिढी व्यसनाधीन याकडे वळलेली आहेत. तसेच प्रपंच उध्दवस्त होत चाललेली आहेत. यासाठी मेहकर व लोणार तालुक्यामध्ये असणारे सर्व अवैध धंदे, दारु, मटका, क्लब, झुगार, कशिनो, लॉजिंग हे सर्व व्यवसामुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. व गुन्हेगारी वाढत आहे.

4) मेहकर शहरातील बोगस मिठाई दुकानदारावरती तात्काळ कार्यवाही करावी व अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात यावे.

5) मेहकर नगरपरिषद समोरील अतिक्रमण हटवुन झाडे लावण्याचे काम सुरु करावे.

6) मेहकर येथील पोलीस वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे. 

7) इ.व्ही.एम मशीन हटवुन बँलेट पेपरने मतदान घ्यावे,

8) शाळा बंदचे परिपत्रक रद्द करुन शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे,

9) सैन्य भरती अग्निपथ बंद करुन पुर्ववत असलेली जुनीच सैन्यभरती कायम करावी,

10) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट रूपये 50,000/ - नुकसान भरपाई द्यावी.

11) तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.[ads id="ads2"]

ह्या मुद्दे नुसार या विषयावर आठ दिवसात कार्यवाही नाही झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यात येईल आसा इशारा तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी दिला आहे..

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️