मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेरच्या विद्यार्थीनीची विभागस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे दिनांक 18 - 12 -2023 रोजी नुकत्याच झालेल्या विभागस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर येथील 14 वर्ष वयोगटातील इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु. कोमल सुनील गाढेया विद्यार्थीनीने *विभागस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत* भाग घेतला होता.[ads id="ads1"]
   या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच या विद्यार्थीनीला  शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. जयेश बिरपन सर व सौ. लक्ष्मी अस्वार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. [ads id="ads2"]

या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. या विद्यार्थीनीला शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️