केळी पीक विमा योजनेत मध्यस्थी,दलाल आणि त्यांना शासकीय,राजकीय,आशीर्वाद असणाऱ्यांची नावे येत आहे समोर : अनेक शेतकऱ्यांसह काही तलाठ्यांची चौकशी होऊन कारवाई होणार..?


यावल  (सुरेश पाटील) केळी पिक विमा योजनेत यावल तहसील,तालुका कृषी कार्यालय,आणि पोलीस स्टेशन कार्यालयापासून ५ ते १० दहा किलोमीटर अंतरापासून संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात तथा फैजपूर विभागाच्या आयएएस असलेल्या प्रांताधिकारी देवयानी यादव तसेच फैजपुर उपविभागीय आयपीएस पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या कार्यक्षेत्रात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात केळी पीक विमा मंजूर होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या मध्यस्थी दलालांची नावे आणि त्यांना शासकीय,राजकीय,आशीर्वाद असणाऱ्या काही ठराविक लोक प्रतिनिधींची नावे आता शेतकरी वर्तुळातून समोर येत आहेत.[ads id="ads1"]

   ज्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष केळी लागवड नसताना त्यांना केळी पीक विम्याचा लाभ मिळाला अशा अनेक शेतकऱ्यांच्या प्रकरणात नावे समोर आली असून त्यांचे ७ /१२ उतारे आणि संबंधित कागदपत्रांचे संकलन करून चौकशी आणि कारवाईची मागणी भारतीय जनसंसद जळगाव जिल्हा यांच्या मार्फत केली जाणार असल्याने केळी पिक विमा योजनेत अनेक शेतकऱ्यांसह काही तलाठी कायदेशीर अडचणीत येणार एवढे निश्चित झाले आहे.

   केळी पिक विमा योजनेतील गैरप्रकार वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना माहिती झाल्याने अनेक विषय समोर येत आहे काही शेतमजुरांनी तर सांगितले की अमुक अमुक गट नंबर मध्ये २०२२-२०२३ या कालावधीत ज्वारीसह  दुसरेl पीक लागवड झालेली असताना केळी पीक विमा मंजूर होऊन विम्याची रक्कम मिळाली कशी..? तसेच काही शेतकऱ्यांची संमती न घेता किंवा त्यांना न विचारता त्यांच्या नावाने बनावट,बोगस, करारनामे करून विम्याची रक्कम कोणकोणत्या दलालांनी मध्यस्थींनी प्राप्त केली आणि या शेतकऱ्यांना माहिती पडले त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्या दलालांनी ते रक्कम परत करण्याचे सत्र सुरू केले आहे. सतीश मध्यस्थी दलालांना पूर्व भागातील काही ठराविक लोकप्रतिनिधीचे शासकीय राजकीय आशीर्वाद मिळाल्याने किंवा मिळणार असल्याने मध्यस्ती म्हणतात आमचे काहीच कोणी वाकडे करू शकणार नाही याबाबत इतर दुसऱ्या शेतकऱ्यांमध्ये तसेच शेतमजुरांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]

       परंतु केळी पिक विमा योजनेतील दलाल,मध्यस्थी आणि संबंधित शासकीय अधिकारी विमा कंपनीची जबाबदार यंत्रणा,ऑनलाइन कामे करणारी यंत्रणा विसरते आहे की बोगस प्रकरणांचे कागदपत्र संकलन केल्यानंतर तक्रार झाल्यावर चौकशीअंति यांचे भ्रष्टाचाराचे,बनावट दस्तऐवजाचे पितळ उघडे पडेल.याबाबत जळगाव जिल्हा भारतीय जनसंसदे मार्फत बोगस प्रकरणांची माहिती व सर्व कागदपत्रांचे संकलन करण्याचे काम सुरू झाले असून लवकरच तक्रार दाखल केली जाणार आहे.

      संबंधित मध्यस्थी,दलाल यांनी गेल्या २ वर्षातच कोट्यावधी रुपयाची शेती इत्यादी प्रॉपर्टी चार चाकी वाहने महागडे मोबाईल,आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च, दुबई फिरस्तीचे दौरे इत्यादी मोठी आर्थिक उलाढा कुठून आणि कसी केली..? याची सुद्धा चौकशी होणार असल्याने संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️