रावेर तालुक्यात विवरे बु ग्रामपंचायत मध्ये पुन्हा विपीन राणे शिवाजी पाटील यांच्या गटाचा दबदबा उपसरपंच निवडणुकीत राष्ट्रवादी चे सामाजिक न्याय विभाग रावेर तालुका उपाध्यक्ष विनोद मोरे विजयी....

 

विवरे बु ता.रावेर (समाधान गाढे) : माजी उपसपंच नीलिमा सनसे यांनी सुरवातीला उपसरपंच पदी भाजपा तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांचा एकमताने पराभव केला होता. त्या नंतर ठरल्या प्रमाणे विपीन राणे यांच्या गटाच्या नीलिमा ताई सनांसे यांनी तीन महिन्यात राजीनामा दिला आणि पुन्हा गावात विपीन राणे गट आणि वासुदेव नरवाडे गट निवडणुकीत आमने सामने आले.[ads id="ads1"]

  वासुदेव नरवाडे गटाने संधी मिळताच उपसरपंच पद त्यांच्या ताब्यात घेतले तेव्हा वासुदेव नरवाडे गटाने विपीन राणे गटाच्या भाग्यश्री विकास पाटील यांना आपल्या कडे खेचून उपसरपंच पदी निवडून दिले तेव्हा विपीन राणे शिवाजी पाटील गटाचे उमेदवार विनोद मोरे एका मताने पराभूत झाले होते. वासुदेव नरवाडे गटाचे भाग्यश्री विकास पाटील यांनी अडीच वर्ष नंतर ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला आणि पुन्हा गावात गटा तटा चे राजकीय वातावरण तापले.[ads id="ads2"]

   गावात पुन्हा राजकीय चर्चा रंगू लागल्या गावात सरपंच हे पद अनुसूचित जाती जमाती चे राखीव होते त्या मुळे युनूस तडवी हे एकच उमेदवार असल्या मुळे युनूस तडवी ची सरपंच पदी निवड झाली होती दोन्ही गटाचे लक्ष उपसरपंच या पदा कडे होते ग्रामपंचायत विवरे बु येथे दि20/11/2023 रोजी सरपंच यांच्या कडे उपसरपंच भाग्यश्री विकास पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा पासून गावात राजकीय तडजोडी चा विषय झाला पण तडजोड होऊ शकली नाही म्हणून विपीन राणे गट व वासुदेव नरवाडे गट पुन्हा उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आमने सामने आले दि 5/12/2023 वार मंगळवार या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली. वासुदेव नरवाडे गटाने रेखाबाई धना गाढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तर सुरवातीला विपीन राणे गटा कडून गट प्रमुख विपीन राणे यांचा अर्ज दाखल केला नंतर शिवाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला काही तासभर गावात राजकीय वातावरण तापले आणी शेवट च्या काही मिनिटात विनोद मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला राजकीय खेडी कोणत्या गटाची यशस्वी होते याकडे ग्रामस्तचे लक्ष लागले. दोन्ही गटाचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते शिवाजी पाटील यांनी व विपीन राणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि लढत रेखाबाई गाढे व विनोद मोरे यांच्या त झाली. 

  वासुदेव नरवाडे गटाचे आठ सदस्य आणि विपीन राणे गटाचे सात सदस्य सुद्धा मतदान केंद्रावर आमनेसामने आले मतदान प्रक्रिया पार पडली. तेव्हा अध्यद्यासी अधिकारी यांनी विपिन राणे गटाचे उमेदवार विनोद मोरे यांना आठ मतांनी विजयी घोषित केले आणि वासुदेव नरवाडे गटाचे उमेदवार रेखा बाई गाढे यांना सात मते मिळून दिल्याचे घोषित केले निवडणूक प्रक्रियेचे कामकाज ग्रामसेवक अधिकारी व अध्यधासी अधिकारी म्हणून सरपंच यांनी पाहिले व निभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी अविनाश पाटील साहेब यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता अतिशय खेडी मेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️