चाळीसगाव नगरपरिषदेचा स्वच्छता प्रीमीअर लीगचा अनोखा उपक्रम

 

चाळीसगाव नगरपरिषदेचा स्वच्छता प्रीमीअर लीगचा अनोखा उपक्रम

  जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांधिलकी निर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीमीअर लीग २०२३-२४ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३-२४, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा – २०२३, नमो ११ कलमी कार्यक्रम अंतर्गत शहर स्वच्छता अभियानातील या प्रीमीअर लीगला नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.[ads id="ads1"]

चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४ चे ९ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.  नगरपरिषदेच्या आरोग्य शहरात स्वच्छता अभियान देखील राबविले जात आहे. यात नागरिकांच्या विविध प्रतिक्रीया, समस्या समजून घेत नगरपरिषदेकडून विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. [ads id="ads2"]

  त्याची अमलबजावणी देखील नगरपालिकामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या स्वच्छता विषयक सूचना एकत्रित करून स्वच्छतेचे १४ निकष ठरविण्यात आले असून त्याआधारे प्रभागातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छता करून अभियानाची सांगता करण्यात येणार आहे.

या लीग मध्ये पर्यावरण पूरक नावे देऊन प्रभागानुसार टीम तयार करण्यात आल्या असून मुकादम त्या टीम चे कर्णधार असतील व त्याच्या अख्यारीत कर्मचारी सदस्य असतील. अश्या एकूण १८ टीम असून त्याची स्पर्धा समतुल्य प्रभागाशी होईल. प्रत्येक टीमला ऍक्टिव्ह मोड वर स्वच्छता करण्याकरिता १ मार्गदर्शक नेमण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतेच्या १४ निकषानुसार प्रभागातील कामाचे मूल्यमापन करणेसाठी चाळीसगाव नगरपालिका शाळाचे शिक्षकांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️