नरेंद्र मोदी हे लोकशाहीतले, तर मोहन भागवत हे संघटनेतील हिटलर - ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जळगावात टिका

 

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : नरेंद्र मोदी हे लोकशाहीतले, तर मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हिटलर आहेत. असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते जळगाव येथे सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते.यावेळी प्रकाश आबंडेकरांनी राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा भाजपेतर (Non BJP) पक्षांच्या निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. (Prakash Ambedkar appeals to elect 30 seats in the Lok Sabha from non-BJP parties)[ads id="ads1"]

प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची या वर्षभरात कुठे भेट झालीय का? याचा खुलासा करा. विधानसभा आणि लोकसभा माणसांच्या पोटाचा प्रश्न आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवतात. आज त्याला धार्मिक आखाडा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या पाकिस्तानने जगासमोर गुडघे टेकले, तुम्हाला त्या पाकिस्तानला गुडघ्यावर आणायला जमत नाही. तुम्ही कसले राज्यकर्ते? असा सवाल देखील त्यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला. [ads id="ads2"]

कंत्राट पद्धती बंद करणार - आंबेडकर

कंत्राट पद्धतीवर लागलेला अधिकारी, कर्मचारी हा सर्वात असुरक्षित आहे. या असुरक्षित अधिकारी, कर्मचाऱ्याला पक्षाच्यावतीने आश्वासन देतो की, उद्या सत्तेत वंचित बहुजन आघाडी सहभागी असेल तर त्याला पर्मनंट केलं जाईल. नव्या गुलामीची मानसिकता सध्या तयार केली जात आहे. या मानसिक गुलामीला कंत्राट पद्धत खतपाणी घालत आहे. वंचित बहुजन आघाडीला एकदा सत्तेत बसवा ही कंत्राट पद्धतीची गुलामी येथे राहणार नाही. असे आश्वासनही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी जळगाव येथील वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार सभेत केले.

हे व्यापाऱ्यांच सरकार

केंद्रशासन हमीभाव जाहीर करते. पण व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात माल विकत घेऊन शेतकऱ्याला लुटत आहे. दुसऱ्या बाजुला शहरातील या मालाची खरेदी करणाऱ्या वर्गालादेखील व्यापारी लुटत आहेत. भाजपमधील आमदार, खासदार यांना आवाहन करतो की, मध्यंतरी टोमॅटोचा तुटवडा झाला. कुठल्या दिवशी आणि कोणत्या बंदरात तुम्ही टोमॅटो आणले ते तरी सांगा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे सरकार व्यापाऱ्यांच सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार नाही. निवडणुकीसाठी फंड पाहिजे म्हणून टोमॅटोचा तुटवडा केला आणि महिन्याभरात या सरकारने 18 हजार कोटी रुपये सामान्य माणसांचे लुटले. असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. सर्वसामान्यांच्या लुटीला हे सरकार पाठीमागे घालत आहे आणि म्हणून या पाठीमागे घालणाऱ्या सरकारला आपण मातीत मिळवलं पाहिजे.


हमीभावाच्या कायद्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, शासनाने दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळवायचा असेल तर इथे बाजार समितीच्या कायद्यात बदल करावा लागेल. बाजार समितीच्या सभापती आणि डायरेक्टर यांना हमीभावासाठी जबाबदार धरावे लागेल. व्यापारी हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत असेल तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असे त्यांनी म्हटले.

भारतीय राज्यघटना वैदिक धर्मावर आधारित नाही तर, संतांच्या विचारांवर आधारित आहे. संतांची विचारसरणी ही समतावादी होती तर, वैदिक धर्माची विचारसरणी ही विषमतावादी होती. असेही त्यांनी यावेळी सांगितले

यावेळी जळगाव शहरातील पठाण बाबा टेकडी, महाबळ रोड येथे ही सभा पार पडली. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवा प्रदेश सदस्य शमीभा पाटील, चेतन गांगुर्डे, प्रा. लभाने, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, बाळा पवार यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️