यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात बोगस डॉक्टरांचे अवैध धंदे सुरू असून याकडे तालुका वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले आहे.यावल पोलीस स्टेशनला आज एका बोगस डॉक्टरला चौकशीसाठी हजर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
यावल मेडिकल असोसिएशन तर्फे यावल तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु तालुका वैद्यकीय विभागामार्फत काय कारवाई करण्यात आली हे मात्र अद्याप समजले नाही परंतु आज यावल पोलीस स्टेशनला एका बोगस डॉक्टरला चौकशी कामी व गुन्हा दाखल करणे कामी हजर केल्याने आणि या प्रकरणात फिर्यादी कोण होणार..? याकडे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads2"]
यावलमध्ये अंदाजे 10 ते 12 वर्षांपासून पदवी नसता बेकायदा अनधिकृत पणे प्रॅक्टिस करून अनेक रूग्णांची आर्थिक लूट करणार्या एका डॉक्टर विरूध्द आज यावल पोलिसात कारवाई कारवाई सुरू झाली.यावल मेडिकल असोसिएशनने तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली परंतु यावल पोलीस स्टेशनला फिर्याद कोण देणार..? याबाबत उपस्थित डॉक्टरांमध्ये आपापसात विचार मंथन सुरू होते.
तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे बोगस डॉक्टरांची तक्रार आल्यानंतर तालुका वैद्यकीय विभागाने आतापर्यंत स्वतःहून फिर्यादी होऊन यावल पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या आहेत किंवा नाही..? याबाबत वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आज रोजी सुरू असलेल्या चौकशी प्रकरणात नेमका फिर्यादी कोण होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे.