केळी पीक विमा योजनेत "फ्रॉड"करणाऱ्यां चौकटीने ऐका विधिज्ञाची/वकिलाची सुद्धा फसवणूक : प्रख्यात वकील तथा शेतकऱ्याच्या भूमिकीकडे संपूर्ण भुसावळ विभागाचे लक्ष वेधून

 


फ्रॉड करणारे म्हणतात बातमी आम्ही दिली संपूर्ण तालुक्याची दिशाभूल

यावल  (सुरेश पाटील )

शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्यांवर लवकरच गुन्हे दाखल होणार..? केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची रक्कम 'हडप' असे वृत्त आज दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाल्याने यावल तालुक्याच्या संपूर्ण भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली,केळी पिक विमा योजनेत तालुक्यातील एका प्रख्यात विधीज्ञ / वकील शेतकऱ्याची सुद्धा शुद्ध दिशाभूल,फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे तसेच संबंधित फ्रॉड करणारे ४ जणांची चौकट मात्र म्हणते की आम्हीच बातमी प्रकाशित करण्यासाठी सांगितले होते (चोराच्या उलट्या बोंबा अशा ऊक्ति प्रमाणे ) अशी सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे विश्वसनीय रित्या समजले आहे.तरी या केळी पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार गैरप्रकाराबाबत प्रख्यात असलेल्या वकील/ शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक झाल्याने कायद्याचे संपूर्ण ज्ञान असलेले विधीज्ञ / शेतकरी फ्रॉड करणाऱ्यांवर काय कारवाई करणार किंवा फ्रॉड करणारे त्यांच्याशी समन्वय साधणार का..? आणि ते 

विधीज्ञ आपली फसवणूक झाल्याबद्दल गप्प बसणार की कारवाई करणार..? याकडे संपूर्ण भुसावळ विभागाचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]

          सन २०२२/२०२३ या आर्थिक वर्षात यावल तालुक्यात अनेक मध्यस्थी दलालांनी संबंधित काही तलाठी,सर्कल,आणि तालुका कृषी कार्यालयातील संबंधितांना तसेच विमा कंपनीच्या अधिकृत काही फर्मवर आपला सामाजिक आणि राजकीय प्रभाव टाकून विश्वासात घेऊन संगनमताने मोठ्या प्रमाणात चिरीमिरी वाटप करून अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट दस्तऐवज कागदपत्र तयार करून कोट्यावधी रुपयाची विमा रक्कम काढून हडप करून घेतल्याची वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरली,तर काही शेतकऱ्यांकडून टक्केवारी ठरवून विमा प्रक्रिया पूर्ण केली तर काही शेतकऱ्यांची विमा रक्कम अजून प्रलंबित असल्याचे समजले,काही शेतकऱ्यांच्या शेतात केळी नसताना केळी पिक विमा मंजूर झाले कसे? ज्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष केळी लागवड असताना मात्र त्यांची केळी पीक विमा मंजूर झाला नाही, आणि ज्यांच्या शेतात केळी नाही अशा शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर केळी पिकाची नोंद कोणकोणत्या तलाठ्यांनी करून घेतली याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत तालुक्यात सर्व स्तरातून व शेतकरी वर्गात मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]

         आर्थिक गुन्हे शाखेला मोठे आव्हान - यावल तालुक्यात केळी पीक विमा योजनेअंतर्गत अनेक काही लाभार्थ्यांच्या प्रकरणांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने केल्यास किंवा त्यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यास या केळी पीक विमा योजनेत अनुक्रमे असलेले काही तलाठी,कृषी अधिकारी, मध्यस्थी,दलाल,विमा कंपनी ऑनलाईन काम करणारी टोळी आणि कोणाच्या प्रभावाखाली कामे झाली इत्यादी कोट्यावधी रुपयाची भ्रष्टाचारी गैरप्रकारचे कृत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही तसेच मध्यस्थी दलाल असणाऱ्यांकडे गेल्या दोन-चार वर्षात कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आणि उलाढाल प्रत्यक्ष कशी करण्यात आली आहे असे यावल तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम विभागात बोलले जात आहे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक लूट हे आजी-माजी लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांना सुद्धा मोठे आव्हान आहे असे समाजातील सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️