नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव कोसळल्यामुळे मनमाड-येवला मार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे मनमाड - शिर्डी, पुणे छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव - धुळे या रस्त्यावरील वाहतूक नांदगाव शहराकडून जात असल्यामुळे गत पाच दिवसापासून नांदगाव शहरात प्रचंड प्रमाणात अवजड वाहनांचा ओघ वाढला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दिनांक एक डिसेंबर 2023 रोजी शुक्रवारी येवला रस्त्यावर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी शनिवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात तातडीची बैठक बोलावून सर्व यंत्रणेला रहदारी नियंत्रणाचे आदेश दिले.[ads id="ads1"]
नांदगाव शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तातडीची बैठक बोलावून दूरध्वनी द्वारे निर्देश देत सांगितले की, वाढत्या रहदारीचा नागरिकांना त्रास होऊ नये, कोणताही अपघात होऊ नये, रहदारी तात्काळ नियंत्रित करावी, मनमाड येथील रेल्वे पुलाचे काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे. नांदगाव शहरातील वाढत्या रहदारीवर यंत्रणेने तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना यावेळी आमदार सुहास गांधी यांनी बैठकीत दिल्या.[ads id="ads2"]
यावेळी बैठकीमध्ये उपस्थितांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे, खड्डे तात्काळ बुजवणे, येवला रस्त्यावर जागोजागी खराब रस्ता तात्काळ रिपेअर करावा, रस्ता चोडीवर गावाचा नकाशा बोर्ड लावणेत यावा मालेगाव रोड ते साकोरा रोड व येवला रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी फोटो पाहत मोकळे करून देण्यात यावे रेल्वे भुयारी मार्गाने ट्रॅक्टरची वाहतूक बंद करणे, शहराच्या बाहेरून जाणाऱ्या नियोजित बायपासचे काम करावे, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने रहदारी जास्त असलेल्या ठिकाणी रहदारी नियंत्रित करण्यासाठी आपले कर्मचारी नेमणूक करावे, अशा सूचना देखील आमदार कांदे यांनी यावेळी दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले की पोलीस प्रशासनाच्या वतीने जागोजागी रहदारी नियंत्रणासाठी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरचे खड्डे बुजविणे, पुलावर संरक्षण पठाडे बसविण्यासाठीचे मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. रहदारी निद्रासाठी नियंत्रणासाठी कर्मचारी नेमणूक करून देणार आहोत. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने रहदारी मित्रासाठी स्टेट बँकेच्या जवळ कर्मचारी नेमणूक करणार असल्याचे अरुण निकम यांनी सांगितले. आमदार सुहास अण्णा कांदेंच्याज्ञ कार्यालयाच्या मार्फत रहदारी नियंत्रण जनजागृतीपर सूचना देणारे रिक्षा शहरात फिरत असून दहा ठिकाणी जनजागृतीचे डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत.
नांदगाव शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात झालेला बैठकीत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, नांदगाव नायब तहसील कार्यालयाचे तहसीलदार चेतन कोनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाची निकम, राष्ट्रीय महामार्गाचे सुपरवायझर हर्षल चौधरी, नांदगाव नगरपालिकेचे अरुण निकम, मंडळाधिकारी योगेश पाटील, माजी सभापती विलासराव आहेर, विष्णू निकम, डॉक्टर सुनील तुसे, सुधीर देशमुख, अमोल नावंदर, सागर हिरे, सुनील जाधव, रमेश काकळीज, पोपट सानप, बापूसाहेब जाधव, भैय्यासाहेब पगार, समाधान पाटील, डॉक्टर प्रभाकर पवार, भारत पारख, शशी सोनवणे, राजेंद्र पवार, प्रकाश शिंदे, मुज्जू शेख, मयूर लोहाडे व पत्रकार यावेळी उपस्थित होते.