महामानवास मानवंदना कार्यक्रम : अतिशभाई खराटे यांची प्रमुख उपस्थिती ; बुद्धभुमी वेल्फेअर असोसिएशन मुंबईचा दरवर्षी स्तुत्य उपक्रम


मुंबई-   तथागत भगवान बुद्ध, धम्म, संघ व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जयभीम नगर बुद्धभूमी वेल्फेअर असोसिएशन मुंबई यांच्या विद्यमाने हिरानंदानी गार्डन पवई मुंबई येथे महामानवास मानवंदना तथा भव्य संघदान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads1"]

       महामानवास मानवंदना तथा संघदान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती महास्थविर भदंत विशुद्धानंद बोधीजी, भदंत शीलबोधी तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे सर, व प्रमुख अतिथि वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, धम्ममित्र रामभाऊ तायडे, प्रा.किशोर वाघ, विजय वाघमारे यांची उपस्थिती होती.[ads id="ads2"]

     या संघदान कार्यक्रमात उपासक उपासिकां द्वारा संघास मोठ्या प्रमाणात वस्तुरूपी संघदान करण्यात आले.

     तसेच या भव्य सोहळ्याप्रसंगी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात अतुलनीय असे सक्रिय अग्रेसर कार्य करणारे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचा बुद्धभूमी वेल्फेअर असोसिएशन मुंबई द्वारे सन्मान करण्यात आला

        याप्रसंगी महाराष्ट्रात ख्याती प्राप्त प्रा. विठ्ठल कांगणे सर, परभणी यांचा उत्कृष्ट असा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला तथा औरंगाबाद येथील प्रा.डॉ. किशोर वाघ व संच यांचा बुद्ध भीम गीत गायनाचा महामानवास मानवंदनेचा सुरेख असा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारोच्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️