रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेला पाठविलेल्या प्रस्तावात गेल्या वर्षी बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या दोन ग्रामसेवकांचाही आदर्श साठी प्रस्ताव विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे आणि सहायक गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे यांनी पाठविल्याची तक्रार मुंजलवाडी येथील ग्रामसेविका कविता बोदडे आणि बलवाडी ग्रामसेवक प्रकाश तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचेकडे केली आहे.[ads id="ads1"]
रावेर पंचायत समिती गेल्या दोन तीन वर्षांपासून या ना त्या कारणांनी गाजत आहे.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रकरणी प स चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आदर्श पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यासाठी संबधित ग्रामसेवक यांचे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल असता कामा नये,असा नियम असताना राहुल रमेश लोखंडे आणि शाम कुमार नाना पाटील यांच्यावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल असतांना आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाही विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे आणि सहायक गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे यांनी आदर्शसाठी त्यांची नावे पाठविल्याची करामत केली आहे.[ads id="ads2"]
या बाबत कविता बोदडे आणि प्रकाश तायडे यांनी चौकशीची मागणी करून विस्तार अधिकारी यांचेसहीत जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी सी इ ओ कडे केली आहे.