नांदगाव तालुक्यातील मंगळणे सरपंचाच्या उपोषणाला वेगळेच वळण; ग्रामसेविकाची बदली न करण्यासाठी एका गटाचे उपोषण


नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :--  नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील ग्रामसेविका एच पी आहेर यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आलेला पदभार काढून घ्यावा या मागणीसाठी दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून मंगळवारपासून बेमुदत उपोषण करणाऱ्या मंगळणे ग्रामपंचायतीच्या आदिवासी महिला सरपंच सौ. वैशाली पवार यांचे बेमुदत उपोषण सुरूच असून आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान सरपंच वैशाली पवार या प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी उपोषण करीत असल्याचा आरोप करीत गावातल्या दुसऱ्या गटाने नांदगाव येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर दिनांक एक डिसेंबर 2023 रोजी शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करीत ग्रामसेविकेची बदली करू नये अशी मागणी लावून धरती.[ads id="ads1"]

      गेल्या पाच दिवसापासून बेमुदत उपोषण करणाऱ्या आदिवासी महिला सरपंच वैशाली पवार या आपल्या दीड महिन्याच्या बाळाला घेऊन आजही आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्या असून दरम्यान सरपंच वैशाली पवार यांच्या उपोषण अर्जातील मुद्द्यांच्या आधारे नांदगाव पंचायत समितीचे गट विकास ग्राम विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे यांनी गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी मंगळणे गावात जाऊन चौकशी करीत काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे जबाब नोंदवून घेत चौकशी अहवाल नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दळवी यांना सादर केला ‌या अहवालामध्ये चौकशी अधिकारी विजय ढवळे यांनी सरपंच यांच्या तक्रार अर्जात तथ्य नसल्याचा ठपका ठेवत विविध मुद्द्यांचा उल्लेख करीत त्यांनी सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण मी कायदेशीर असल्याचा दावा आपल्या अहवालात केला आहे. [ads id="ads2"]

  एकूणच मंगळणी गावातील उपोषणाला आज वेगळेच वळण (पदर) लाभले. नांदगाव येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर मंगळणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सरपंच वैशाली पवार यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले. सायंकाळी मागे घेण्यात आले असले तरी नव्या पंचायत समिती समोर सरपंच वैशाली पवार यांचे पाचव्या दिवशी देखील उपोषण सुरूच आहे. जोपर्यंत ग्रामसेविका एच पी आहेर यांच्याकडे असलेला मंगळणे  गावाचा तात्पुरता सोपविलेला पदभार काढला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार उपोषण सुरू ठेवली आहे. दरम्यान लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांनी पंचायत समितीची यंत्रणा संशयास्पद वागत असल्याचा आरोप केला आहे.

       या दोन गटातील असलेले आरोप प्रत्यारोपामुळे ग्रामसेवक व प्रशासनाचे फावले असल्याचे म्हणण्यास वावगे ठरणार नाही‌. ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभा या ज्यावेळेस ग्रामसेवक सरपंच घेतात त्यावेळेस ग्रामसेवक सचिव या नात्याने ग्रामसभेत आणि मासिक सभेत झालेले विषय ठराव विकास कामे प्रोसिडिंगवर त्याच वेळेस करत नाहीत फक्त प्रोसिडिंगवर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व व ग्रामस्थांच्या सह्या घेतात परंतु प्रत्यक्षात कुठलेही ठराव लिहिले जात नाही ‌ त्यानंतर ग्रामसेवक त्याच्या मनमानी कारभार करून त्याच्या मनाने ठराव करतात अशी ही खरी वास्तव स्थिती आणि त्यास वरिष्ठ अधिकारी दाबून ठेवण्याचा प्रकाराला साथ देतात. त्यामुळे गावाचा विकास होत नाही. एखादा व्यक्ती किंवा सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसेवकांना काही विचारणा केल्यास त्यांच्यावर ३५३ सारखे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिला जातात. वेळ पडली तर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल केले जातात. ही वस्तुस्थिती आहे.

         मंगळणे या गावातील काही व्यक्तींवर अतिक्रमणाच्या मुद्द्यावर 353 सारखे गुन्हे नांदगाव पोलीस स्टेशनला दाखल असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आहेर ह्या काही अतिक्रमण धारकांवर कारवाई करतात. तर काही अतिक्रमणधारकांवर कारवाई का करत नाही हा प्रश्न येथील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.‌

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️