रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि. 7 ते 10 डिसेंबर दरम्यान ठाणे येथे झालेल्या 17आणि 19 वर्ष वयोगट राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सरदार जी जी हायस्कूलच्या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत सुवर्ण रोप्य, कास्य पदकांची लयलूट केली. दीक्षांत महाजन या खेळाडूने 19 वर्ष आतील मुलांच्या स्पर्धेत 61 किलो वजनी गटात 202 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले. [ads id="ads1"]
या कामगिरी मुळे दीक्षांत महाजन याची *25 ते 30 डिसेंबर बिकानेर राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
19 वर्ष आतील मुल
1 देवेंद्र महाजन प्रथम क्रमांक
2 पुष्कर महाजन द्वितीय क्रमांक
3 पवन चौधरी द्वितीय क्रमांक
17 वर्ष आतील मुल
1 जयेश महाजन तृतीय क्रमांक
या स्पर्धेत
पियुष महाजन चेतन महाजन रोहित तायडे पार्थ महाजन यांनी देखील सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली. तर मुलींच्या 17 वर्ष आतील स्पर्धेत 40 किलो वजन गटात सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूल ची खेळाडू कुमारी मोनिका महाजन हिने द्वितीय क्रमांक पटकविला तर रोशनी महाजन, नूतन महाजन यांनी सहभाग घेतला. [ads id="ads2"]
सर्व विजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा पोलिस दलातील फैजपूर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार तथा वेट लिफ्टीग प्रशिक्षक श्री.योगेश महाजन यांचे प्रशिक्षण मिळाले तर अजय महाजन युवराज माळी जे के पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मुजुमदार सर उपाध्यक्ष अशोक शेठवाणी चेअरमन डॉक्टर दत्तप्रसाद दलाल व सर्व संचालक मंडळ सरदार जी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एस जे वाणी सर उपमुख्याध्यापक जयवंत कुलकर्णी उपप्राचार्य एन जे पाटील सर कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जे एस कुलकर्णी मॅडम उप मुख्याध्यापक आर आर पाटील सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन च्या सर्व पदअधिकाऱ्यांनी कौतुक केले तर पुढील खेळा साठी शुभेच्छा दिल्या.