मध्यरात्री झालेल्या चक्री वादळी पावसामुळे साकळी मंडळात शेती पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान


आज दि.१ सकाळ पासून यावल तहसीलदार,सर्कल,तलाठी यांच्याकडून नुकसान झालेल्या शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी सुरू

यावल ( सुरेश पाटील) काल गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास आणि त्यानंतर म्हणजे शुक्रवार दि.१ डिसेंबर २०२३ चे मध्यरात्री

झालेल्या चक्री वादळी पावसामुळे यावल तालुक्यातील साकळी मंडळात शेती पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले.वृक्ष कोलमडून पडल्याने काही वेळ एसटी बस व इतर वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती ग्रामस्थांनी प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.[ads id="ads1"]

आज दि.१ सकाळ पासून यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर, मंडळ अधिकारी सचिन जगताप,मनवेल,थोरगव्हाण, साकळी येथील तलाठी वानखेडे यांच्याकडून नुकसान झालेल्या शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी सुरू झाली.

      यावल तालुक्यात मध्यरात्री साकळी मंडळात ३६.५ मी.मी., किनगाव ३९.९., यावल ८२, बामणोद १५.३, फैजपूर ४ मी.मी चक्रीवादळासह पाऊस झाला त्यात साकळी मंडळातील थोरगव्हाण- मनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे.[ads id="ads2"]

       जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दि.१ सकाळपासून तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी थोरगव्हाण परिसरातील भागात नुकसान झालेल्या शेती पिकांची व नुकसान झालेल्या शेतांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील कारवाई सुरू केली आहे.

यावल पंचायत समिती माजी सभापती अरुण आबा पाटीलयांच्या थोरगव्हाण शिवारातील शेतातील १० हजार लागवड केलेला केळी पील बाग चक्रीवादळाने नष्ट झाला तसेच टमाटे,कपाशी इत्यादी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️