पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीचा दुसऱ्या दिवशीच मृत्यू : रावेर शहरातील घटना


 रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) -  दिनांक 2 डिसेंबर २०२३ शनिवारी पहाटे पहाटे दीड वाजेच्या सुमारास नशिराबाद जवळ झालेल्या अपघातामध्ये रावेर शहरातील  महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले होते. जखमीमध्ये मयत महिलेच्या पतीचाही समावेश होता. दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी पत्नीच्या विरहामध्ये पतीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.[ads id="ads1"]

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्याजवळ नाशिकहून रावेरकडे येत असलेल्या रावेर शहरातील सुनील हंसकर यांच्या कारला शनिवारी पहाटे अपघात झाला.[ads id="ads2"]

या अपघातामध्ये निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हा नियोजन समिती उपाध्यक्ष सुनील हंसकर यांच्या पत्नी सावित्री सुनील हसकर (50, रा. रावेर) यांचा मृत्यू ओढवला तर कारमधील सुनील हंसकर यांच्यासह तीन जण जखमी झाले होते. यात मयताचे पती सुनील पंडीत हंसकर यांचाही समावेश होता.

 शनिवारी पत्नीवर अंत्यसंस्कार केल्यापासून सुनील हंसकर यांची पत्नीच्या विरहाने प्रकृती खालावल्याने त्यांना सकाळी रावेर  शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखवण्यात आले. त्यानंतर मध्यप्रदेशातील ब-हाणपूर येथील रूग्णालयात त्यांना हलवण्यात आले. त्या ठिकाणी सायंकाळी सुनिल हंसकर यांचा मृत्यू ओढवला. चित्रपटसृष्टीतील सिनेमॅटिक फोटोशूट व्यावसायिक तथा चित्र दिग्दर्शक करण व यश हंसकर यांचे ते वडील होत. पती पत्नीच्या मृत्यूने रावेर शहरात सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️