रावेर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी ;90% राजकीय,सामाजिक यंत्रणा गप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप


यावल ( सुरेश पाटील) शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्यांवर लवकरच गुन्हे दाखल होणार..? केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची रक्कम हडप तसेच केळी पीक विमा योजनेत फ्रॉड करणाऱ्या चौकटीने वकिलाची केली फसवणूक,वकिलाच्या भूमिकेकडे संपूर्ण भुसावळ विभागाचे लक्ष वेधून अशा प्रकारचे वृत्त गेल्या 2 दिवसांपूर्वी प्रसिद्ध होत असल्याने शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळीबाबत 90% यंत्रणा गप्प असल्याने या लुटारूंना त्यांचे सहकार्य आहे का..? काही राजकारणी, सत्ताधारी,समाजसेवक आणि काही संघटना,काही विरोधक शेतकऱ्यांची लूट झाल्याबाबत काहीही बोलत नसल्याने अनेक प्रश्न रावेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण भुसावळ विभागात उपस्थित केले जात आहेत. [ads id="ads1"]

        सन 2022-2023 या आर्थिक वर्षात केळी पिक विमा मंजूर झाला त्या प्रक्रियेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट करारनामे,बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या उद्योगात यावल- रावेर तालुक्यातील काही संबंधित तलाठी यांनी बनावट सातबारा उतारे तयार करून शेतामध्ये केळी पीक प्रत्यक्ष नसताना केळी पिकाची नोंद करून केळी पीक विमा काढणाऱ्या यंत्रणेला सहकार्य केले,त्यानंतर या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसताना त्यांच्या नावावर केळी पीक विम्याची रक्कम हडप करण्यात आली तर काही शेतकऱ्यांना केळी पीक विमा मंजूर करण्यासाठी काही मध्यस्थी दलालांनी मोठमोठ्या आर्थिक रकमा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली.केळी पीक विमा प्रकरणांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर स्टॅम्प वेंडर यांनी शंभर रुपयाचे स्टॅम्प कोणाच्या नावावर आणि कोणाजवळ दिले आणि कोणाच्या स्वाक्षरीने दिले हा सुद्धा कायदेशीर मुद्दा यावल रावेर तालुक्यात उपस्थित केला जात आहे. केळी पीक विमा मंजुरीसाठी काही तज्ञ तरुण हे लॅपटॉप घेऊन तालुका भर हिंडत होते आणि आपला उद्देश साध्य करून घेतला आहे इत्यादी अनेक प्रश्न गेल्या वर्षभरात सर्वत्र ठीक ठिकाणी चर्चिले जात असताना मात्र यावल रावेर तालुक्यातील सत्ताधारी गटातील अनेक पदाधिकारी तसेच विरोधी गटातील काही ठराविक विरोधक मात्र गप्प बसले याला शेतकऱ्यांचे हित साध्य करणारे राजकारण समाजकारण म्हणतात का असा प्रश्न रावेर विधानसभा मतदारसंघात उपस्थित केला जात असून याबाबत भावी निवडणुकांमध्ये काही सुज्ञ शेतकरी भावी उमेदवारांना याबाबत जाब विचारणार आहेत.[ads id="ads2"]

        केळी पीक विमा मंजूर करणाऱ्या टोळींजवळ गेल्या दोन-तीन वर्षात कोट्यावधी रुपयाची माया कोणाच्या आशीर्वादाने आणि ते कोणत्या कार्यक्षेत्रातील आणि कोणाच्या आशीर्वादा खाली दलाल आणि मध्यस्थी आहेत याबाबत सुद्धा चौका चौकात शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

        केळी पिक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाताना कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत संबंधित काही तलाठी,कृषी खात्याशी संबंधित कर्मचारी,काही स्टॅम्पेंडर,ऑनलाइन काम करणारी यंत्रणा,काही अधिकारी,विमा कंपनीचे एजंट आणि विमा कंपनीशी संपर्कात असणारे मध्यस्थी दलाल कोण कोण सक्रिय होते आणि आहेत..? आणि शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जेवढी मिळणार आहे त्याच्या निम्मे म्हणजे 50 टक्के रक्कम आधी शेतकऱ्याला रोख स्वरूपात  खर्च करावी लागली, आणि ही 50 टक्के रक्कम कोणाच्या सहकार्याने आणि कोणा कोणाच्या आशीर्वादामुळे कोणाकोणामध्ये वाटप झाली याबाबत सुद्धा संपूर्ण यावल रावेर तालुक्यात उघडपणे सार्वजनिक ठिकाणी बोलले जात असून राजकारणात समाजात याबाबत आवाज उठविला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️