बोदवड : दि.22/12/23 ला शासकीय विश्राम गृह, बोदवड येथे वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी संघटनाच्या माध्यमागून दि.25 डिसेंबर 2023 ला "स्त्री मुक्ती दिन परिषद" साखला कॉलनी, बोदवड येथील त्रिरत्न बौद्ध विहार शेजारील हॉल मध्ये सकाळी 10 ते दुपारी 2:00 पर्यंत मध्ये घेण्याबाबत बैठक संपन्न झाली.[ads id="ads1"]
सदर बैठक ही वंचित बहुजन आघाडी च्या महिला जिल्हा सचिव वंदनाताई आराक याच्या अध्यक्षते खाली पार पडली या बैठकित परिषदेच्या प्रमुख वक्त्या राष्ट्रीय कीर्तनकार माईसाहेब अमृता पाटील तर प्रमुख उपस्थितीत मध्ये प्रदेश सदस्या शामिभा पाटील, कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाडी च्या वंदनाताई सोनवणे व स्वागत अध्यक्ष बोदवड तालुका प्रमिला बोदडे,भारतीय बौद्ध महासभाच्या जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, हे असतील असे ठरविण्यात आले.[ads id="ads2"]
. तर या बैठकिचे सूत्रसंचालन बोदवड तालुका अध्यक्ष प्रमिला बोदडे यांनी केले, तर बैठकीला मार्गदर्शन संगीता धोबी, प्रियांका अहिरे, वैशाली सरदार व वंदना आराक माजी जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे व प्रकाश सरदार, बी. के. बोदडे, बोदवड तालुका अध्यक्ष सुपाडा निकम, यांनी केले
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे,युवा अध्यक्ष आशिष गुरचळ ,सिंधू निकम, सुनीता पालावे, सुनीता सुरळकर, सिंधू सुरवाडे, संगीता सुरवाडे,जिजाबाई गायकवाड, बेबाबाई गायकवाड,दिलीप पो्हेकर, देवदत्त मकासरे,शाहरुख शहा रहीम शहा, अनिल वानखेडे, शांताराम मोरे,तन्वीर रहीम मन्यार,भास्कर गुरुचळ, रामदास मोरे,राहुल मोरे,नागसेन सुरळकर,सिद्धार्थ बोदडे इत्यादी उपस्थित होते, आभार प्रदर्शन प्रमिला बोदडे यांनी केले.