श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज बोलठाण येथे शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023 उत्साहात संपन्न

नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी नहार, सचिव सुरेंद्रती नाहटा, व महावीरजी नाहटा, देवेंद्रजी नाहर, आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads1"]
       शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023 प्रदर्शनात एकूण 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर प्रदर्शनात आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण, जीवन, शेती, आधुनिक तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, चंद्रयान, दळणवळण, संगणकीय विचार या विषयावर प्रकल्प सादर करण्यात आले होते. [ads id="ads2"]
  या विज्ञान प्रदर्शनासाठी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज विद्यालयातील मुख्याध्यापक श्री शेलार सर, पर्यवेक्षक श्री बोरसे सर, व ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत साबळे सर, विज्ञान छंद मंडळाचे अध्यक्ष श्रीमती जगताप मॅडम, उपाध्यक्ष श्री ठाकरे सर आणि सर्व विज्ञान मंडळाचे सदस्य, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील बहुसंख्य पालक मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले.
       बोलठाण येथील के सी. नहार पतसंस्थेचे चेअरमन अमितजी नहार व संचालक मंडळ याप्रसंगी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️