नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मौजे मंगळणे ग्रामपंचायतींच्या ग्रामसेविका एच पी आहेर या मनमानी कारभार करत असल्याने व सरपंचांना विश्वासात घेता नसल्याने ग्रामसेविकेच्या विरोधात ग्रामसेविकेची बदली करण्यात यावी व इतर मागण्यासाठी मंगळणे ग्रामपंचायतच्या आदिवासी महिला सरपंच सौ वैशाली पवार यांनी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन नांदगाव पंचायत समिती समोर पाच ते सहा दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु नांदगाव पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे व गटविकास अधिकारी दळवी यांनी सरपंच वैशाली पवार यांचे बेमुदत उपोषण बेकायदेशीर आहेत असा ठपका ठेवला आहे. तर गावातील दुसऱ्या गटाने सरपंचावर अतिक्रमणा बाबत कारवाई करावी व ग्रामसेविका आहेर यांची बदली करू नये यासाठी नांदगाव येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु खरी वस्तुस्थिती प्रमाणे कुठलीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप सरपंच वैशाली पवार यांनी केला आहे .[ads id="ads1"]
मंगळणे येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांची बदली 22 /8/2023 रोजी बदली झाली असून देखील. ग्रामसेविका हिमगौरी पंडितराव आहेर यांनी चार्ज सोडला नाही. त्या चार्ज का सोडत नाही हा प्रश्न सरपंच व नागरिक करत आहेत वरिष्ठ अधिकारी याबाबत दखल घेऊन कारवाई करत नाहीत तसेच येथील शरद विजय आहेर या 14 ते 15 वर्षाच्या मुलाच्या नावे 15 जुलै 2022 काही रक्कम पाणीपुरवठा काम करण्यासाठी काढल्याची माहिती समोर आली आहे.[ads id="ads2"]
नियमानुसार बालकाकडून काम करून घेऊ नये असे आदेश असताना देखील मंगळणे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी 14 ते 15 वर्षाच्या बालकाकडून काम करून त्याला पैसे कसे दिले. ही वस्तुस्थिती दडपवून टाकून सरपंचांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण बेकायदेशीर कसे आहे हे नांदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून खरी वस्तुस्थिती समोर आणून संबंधितावर कारवाई करावी. ग्रामसेवकांची त्वरित बदली करून मंगळणे गावाचा विकास करावा सरपंचासह नागरिकांकडून बोलले जात आहे.
सरपंच वैशाली पवार यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांचे दबाव टाकण्याचे षडयंत्र बंद करून ग्रामसेविकेची बदली होत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषण सोडणार नाही व होणाऱ्या परिणामास नांदगाव पंचायत समितीचे शासकीय अधिकारी शासन व प्रशासन राहील असे म्हटले आहे.