जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शेतातील ट्यूबवेल मोटार कनेक्शन देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा (ता. चोपडा) येथील वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (वय २८) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी (दिनांक २२ डिसेंबर 2023) दुपारी लाच स्वीकारताच अटक केली.या कारवाईने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. [ads id="ads1"]
५० वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीचे नावाने देवगाव (ता. चोपडा) शिवारात गट नंबर ३३० मध्ये शेत आहे. या शेतात थ्रीफेजचे ट्यूबवेल मोटारसाठी तक्रारदार यांनी वीजजोडणी घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता.[ads id="ads2"]
तक्रारदार अनिल राठोड यांना भेटल्यानंतर त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारांत तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद पोलिसांत (Adawad Police Station) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.