भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचा रोजंदारी कंत्राटी मजुरांच्या हितार्थ न.प.चोपडा कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण


भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचा रोजंदारी कंत्राटी मजुरांच्या हितार्थ न.प.चोपडा कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण

चोपडा(सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

चोपडा येथील नगरपरिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचा आज दिनांक 20 नोव्हेंबर  2023 रोजी भारतीय सविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ नागरिक भाऊसाहेब कांबळे हे नगरपरिषद प्रशासन संचालनालाय बेलापूर नवी मुंबई येथे रोजंदारी कञाटी शोषित दलित बहुजन समाजातील मजुराच्या हितार्थ आमरण अन्नत्याग उपोषणास बसणार आहेत.[ads id="ads1"]

  आम्ही त्याच अनुषंगाने चोपडा नगरपरिषद चोपडा येथे सकाळी ११.३० वाजेपासून ते १.३० वाजेपर्यंत उपोषणास काळी फित लावून निषेध व्यक्त केला.भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र संघटनेचा विजय असो ,रोजंदारी कञाटी मजुरांना न्याय मिळालाच पाहिजे,आमचा एकच नारा रोजंदारी कञाटी शोषित दलित मजुरांना न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा दिल्या महाराष्ट्र राज्यातील 387 नगरपरिषद नगरपंचायत अ.ब.क वर्गामध्ये शोषित दलित रोजदारी कञाटी मजुरांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे जमा करावे व त्यांचा ईपीएफ कार्यालयामध्ये जमा करण्यात यावा त्यांचे शोषण करून आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकार यांचे कडून पैसे वसूल करून त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे व दोषी ठरणाऱ्या संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.[ads id="ads2"]

   उपोषण स्थळी सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दिली.सदर उपोषण स्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी उपोषणासाठी सहभाग जळगाव जिल्हा महासचिव हेमकांत गायकवाड, तालुका अध्यक्ष सुनील पावरा,तालुका उपाध्यक्ष डाॕ.रवींद्र कोळी,शहर सचिव विकी पारधी,शहर कार्याध्यक्ष राहुल बाविस्कर,तालुका संघटक दिनेश पाटील यांनी नोंदविला होता.तसेच तसेच तालुका सदस्य समाधान बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते संदिप बाविस्कर यांनी देखील उपोषणास पाठिंबा दिला.उपोषण सोडविण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विनायक पाटील यांनी सरबत पाजुन उपोषण सोडविले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️