अनाथ महिलेची पुण्यतिथी साजरी करत निर्माण केला आदर्श


प्रतिनिधी : फिरोज तडवी

जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर येथे नुकताच अनुकरणीय आदर्श पुण्यतिथी साजरी करण्यात आली.लासूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आशा गजरे यांनी गावातील आदिवासी महिला स्व.लाडकाबाई भिल्ल यांना आई मानले होते.स्व.लाडकाबाई यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होता अश्यातच सेवानिवृत्त आरोग्य सेविका आशा गजरे यांनी त्यांच्या सांभाळ करण्याची जबाबदारी उचलली त्यांच्या अन्न कपडे इत्यादी मूलभूत गरजांची त्या काळजी घेत म्हणून स्व.लाडकाबाई यांनी आशा गजरे यांना मुलीच्या दर्जा देत तूच मला अग्निडाग द्यावा असे सांगितले.[ads id="ads1"]

   मागील वर्षी लाडकाबाई यांचे निधन झाले त्यावेळी आशा गजरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना स्व.लाडकाबाई अंत्यविधी करता आला नाही.हीच खंत मनात असल्याने त्यांनी स्व. लाडकाबाई भिल्ल यांची पुण्यतिथी साजरी करत मानवतेच्या संदेश दिला.[ads id="ads2"]

       आज मुले वर्तमानात स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत असतांनाच अनाथ वृद्ध महिलेच्या सांभाळ करत श्रीमती आशा गजरे यांनी आदर्श निर्माण केला.सदर पुण्यतिथी कार्यक्रमात स्व.लाडकाबाई भिल्ल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी पं स सदस्य अनिल पाटील,उपेंद्र पाटील,रमेश ठाकूर,गोपाळराव सोनवणे,आशा गजरे यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सरपंच नर्मदाबाई भिल्ल,अनिल पाटील,विजय पाटील, ओमप्रकाश पालीवाल,देविलाल बाविस्कर,गोपाळराव सोनवणे, उपेन्द्र पाटील,अशोक पाटील, वसंत पाटील,रमेश ठाकूर,श्रीराम पालीवाल,आत्माराम पाटील, संजय पारधी,पंकज कोळी, प्रभाकर पाटील,अशोक मुडीकर,रमेश जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम जावरे यांनी केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️