जळगाव जिल्ह्यातील "या" मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी पूर्वीच फळ पिक विम्याचा लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची माहिती

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) पुनर्रचित हवामानावर आधारित *“फळ पिक विमा योजना आंबिया बहार”* PMFBY सन २०२२ मध्ये एकूण ७८००० शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४००० शेतकऱ्यांना जळगाव  जिल्ह्यातील "या" मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी पूर्वीच फळ पिक विम्याचा PMFBY लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची माहिती  येत्या ४-५ दिवसात थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली. [ads id="ads1"]

आपल्या पिका विमा PMFBY उतरविलेल्या एकूण *७८०००* शेतकऱ्यांपैकी *५४०००* शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार असून, ११००० शेतकऱ्यांनी पिक नलावता विमा उतरविलेला असल्याचे तसेच १३००० शेतकऱ्यांनी अधिकचा म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेला असल्याचे पिक विमा कंपनीच्या PMFBY सर्वेक्षणात आले असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. तसेच त्यांनी योग्य पद्धतीने विमा उतरविलेला असून, त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही, अश्या शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील कृषी कार्यालय येथे सर्व पुराव्यासह अर्ज सादर करावा अशी माहिती *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी दिली. [ads id="ads2"]

*केळी विमा पात्र महसूल मंडळ-*

*1) रावेर* - खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा, रावेर, खानापुर, ऐनपुर 

*2) चोपडा* - अडावद, लासूर, धानोरा प्र.चोपडा, गोरगावले, हातेड बु., चाहर्डी 

*3) मुक्ताईनगर* - घोडसगाव, अंतुर्ली, कुऱ्हा, मुक्ताईनगर

*४) यावल* - भालोद, साकळी, किनगाव बु., बामनोद, यावल, फैजपुर,

*५) भुसावळ* - वरणगाव, पिंपळगाव खु., भुसावळ

*६) जामनेर* -  नेरी, शेंदुर्णी, मालदाभाडी, जामनेर, पहूर

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️