बोदवड (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- तालुक्यातील निमखेड या गावी भारतीय बौद्ध महासभा जळगाव पुर्व अंर्तगत बोदवड तालुका शाखा च्या वतीने आज निमखेड येथे 29/10/2023 ते 08/11/2023 पर्यन्त दहा दिवशीय महिला उपासिका शिबीर घेण्यात आले. या शिबीर चा समारोप आज करण्यात आला.[ads id="ads1"]
या शिबिरास प्रमुख मार्गदर्शका केंद्रीय शिक्षकिका वैशाली सरदार हया होत्या.
तसेच या दहा दिवसीय महिला शिबीर सतरा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले त्याचा समारोपचा कार्यक्रम आज संपन्न झाला असता कार्यक्रमाला जिल्हा महिला अध्यक्षा प्रियकां अहिरे, शिक्षीका करुणा नरवाडे,तालुका महिला सचिव संगिता निकम, रंजना बोदडे,जिल्हा संघटक बि. के.बोदडे,जिल्हा संघटक प्रकाश सरदार, तालुका अध्यक्ष शांताराम मोरे,तालुका सरचिटणीस प्रमोद सुरवाडे, हिसोबतपासणीस रमेश इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी वाघ यांनी केले. [ads id="ads2"]
उपस्थित पुढील महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये ख़ुशी तायडे, संगीता वाघ, रिया तायडे, अरुणा वाघ, सुजाता तायडे, वंदना वाघ, विद्या वाघ,मंगला वाघ तसेच गावातील मोठया प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला.
त्यावेळी महिला ची निमखेड शाखा ची कार्यकारणी जिल्हा अध्यक्षा प्रियांका अहिरे यांनी घोषित केली ती पुढील प्रमाणे शाखा अध्यक्ष - राणी वाघ, उपाध्यक्ष सुजाता तायडे, सचिव मनीष वाघ, कोषाध्यक्ष मंदा वाघ, सदस्य शांताबाई वाघ, सरला थाटे, विश्रांती तायडे,निशा वाघ, जिजाबाई वाघ, आम्रपाली चव्हाण, सुरेखा वाघ इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले.