बुलढाणा- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री. अजय चैताने कार्यालय अधिक्षक मेहकर नगरपरिषद यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, मा.सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले की मेहकर शहरातील मुख्य चौकात असलेल्या मिठाईच्या स्वीट मार्टच्या दुकानामध्ये बोगस व आरोग्यास हानिकारक आशी भेसळ युक्त मिठाई विकल्या जात आहे सद्द्या दिवाळीच्या सनामध्ये वेग वेगळ्या प्रकारची मिठाई सर्व सामान्य जनता खरेदी करत आहे परंतू हीच भेसळ युक्त मिठाई पर राज्यातुन बनवुन आणुन या स्विट मार्टच्या दुकानामध्ये सरास पणे विकली जात आहे.[ads id="ads1"]
तरी या मिठाईचे नमुने घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवीण्यात यावे व बेसळ युक्त मिठाई विकुन जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या मिठाई दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच नगर परिषद समोर असलेल्या जागेमध्ये जे अतिक्रमण आहे त्यामुळे शाळेतील लहान मुलांचा व येणार्या जाणार्या लोकांनचा दुचाकी किंवा चारचाकी वाहणामुळे आपघात होऊन जिवीत हाणी होण्याची दाट शक्यता आहे व कलेक्टर यांच्या आदेशान्वये मेहकर नगरपरिषद सी.ओ साहेब यांना बाहेरील अतिक्रमण हटवुन झाडे लावून परिसर सुशोभिकरण करण्यात यावे असे आदेश दिले असता ते काम पुर्ण न झालेले दिसुन आले आहे या सदर मागण्या येत्या आठ दिवसात पुर्ण न केल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने तिव्र आंदोलन झेडण्यात येईल आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, गौतम नरवाडे, कुणाल माने, राधेशाम खरात, संतोष अवसरमोल, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, सिताराम गवई, महादेव मोरे, नितीन बोरकर, विजय सरकटे, युनुस शहा तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..