जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन



२०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

  जळगाव, (राहुल डी गाढे) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्याचे,  योगादानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ व जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन -२४ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. [ads id="ads1"]

 जिल्हा क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार नियमावली, शासन निर्णय- दि. २ मार्च, २०२३ www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – एक, पुरस्कार वर्ष – २०२२-२३, व २०२३-२४, कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाईल- दि. १ जुलै, २०११ ते दि. ३० जुन, २०२१ व दि. १ जुलै, २०१२ ते दि. ३० जुन, २०२२ , गुणवंत खेळाडू पुरस्कार – तीन जणांना दिला जाणार आहे. यात महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूंना दिला जाणार आहे. पुरस्कार वर्ष – २०२२-२३, व २०२३-२४ दि. १ जुलै, २०१७ ते दि. ३० जून, २०२२ आहे. [ads id="ads2"]

या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख  रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सन २०२२-२३ व २०२३-२४ च्या पुरस्काराकरिता दि. १ जुलै ते दि. ३० जुन पर्यन्त कामगिरी, कार्य ग्राह्य धरण्यात येईल.  जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२२ -२३ व २०२३ -२४ अर्ज भरण्याचा कालावधी ४ ते २० नोव्हेंबर, २०२३, अर्जदाराने ऑनलाईन हार्ड कॉपी कार्यालयात २० नोव्हेंबर,२०२३ पर्यंत सादर करावी‌ अर्जाबाबत अधिक व माहिती करीता श्रीमती सुजाता गुल्हाने - ९७६३२३११४६ संपर्क साधावा. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याकरीता व पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️