माजी मंत्री नाथाभाऊ यांचे बद्दल बोलताना तुमची जीभ का गळाली नाही.. तुमचा हात कसा ढील्ला पडला नाही....


यावल  ( सुरेश पाटील)

बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्री गिरीशजी महाजन यांनी केलेल्या राज्याचे नेते मा.आ.एकनाथ रावजी खडसे साहेब यांच्या आजारपणा बद्दल बेताल असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन... शनिवार दि.२५/११/२०२३ बोदवड मार्केट कमिटी समोर रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. [ads id="ads1"]

   एकीकडे राष्ट्रवादी चे राज्याचे  नेते मा.नाथाभाऊ यांनी मुख्यमंत्री महोदय ना.एकनाथ जी शिंदे साहेब यांनी तात्काळ वेळेत "हवाई रुग्णवाहिका" पाठवल्याने त्यांचे जाहीर आभार मानतात.. उपमुख्यमंत्री (१) ना. देवेंद्र जी (२) ना.अजित दादा यांचे सह सर्वपक्षीय बरेच राजकीय सहकारी मित्र,नेते यांनी आजारपणाची चौकशी केली.सर्वांचे आभार सदिच्छा वृत्तवाहन्यांवरील बोलण्यात मा.नाथाभाऊ जाहीरपणे राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलत आहेत हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले.[ads id="ads2"]

मात्र, जिल्ह्यातील मंत्री गिरिश जी महाजन साहेब मा.नाथाभाऊ यांच्या आजारपणाची टिंगल टवाळी जाहीरपणे वृत्त वाहिन्यांवर करतात..त्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष जळकेकर भाजपच्या संस्कृतीचे असे पाढे वाचतात..

   जुमलेबाज भाजप  सरकारचे जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज,आणि माजी आ.स्मिता ताई वाघ यांचे कालचे  भाजपा आंदोलन पूर्णतः विरोधाभासी होते.तथ्य हिन होते.विषय भरकटवणारे होते. ते केवळ वरिष्ठ नेत्यांच्या मर्ज्या  सांभाळता याव्या या साठी असे निंदनीय आंदोलन होते. आपली पात्रता नसताना ज्येष्ठ नेते मा.नाथाभाऊ यांचे बद्दल त्यांच्या अनुभवाच्या वया बद्दल बेताल वक्तव्य करत आहेत.भाजपाच्या घाणेरड्या प्रकारा बाबत सर्व जिल्यातील सर्व पक्षीय लोक, सामान्य लोक वाईट प्रतिक्रिया नोंदवत आहे.राज्यासह जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे.

 कापूस उत्पादक शेतकरी पीक विमा भरपाई मिळत नाही आणि भाव वाढ होत नाही.या मुळे चिंतेत आहे.सरकारी दवाखान्यात डॉकटर आणि औषधसाठा उपलब्ध नाही. यावर उपाययोजना करणे सोडून तथ्यहीन भाष्य करताना भाजपा पदाधिकारी करत आहेत. आज निषेध प्रसंगी बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समस्त सन्माननीय आजी माजी पदाधिकारी गण,नगरसेवक, बाजार समिती उप सभापती,संचालक सर्व सेल विभाग पदाधिकारी हजर होते. तालुकाध्यक्ष आबा पाटील,प्रवक्ते प्रमोद धमोडे यांनी निषेध करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️