अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाची दुरावस्था ; उर्वेश साळुंखेने पाण्याच्या डबक्यात बसून आंघोळ करून प्रशासनाचे वेधले लक्ष

 अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाची दुरावस्था ;  उर्वेश साळुंखेने पाण्याच्या डबक्यात बसून आंघोळ करून प्रशासनाचे वेधले लक्ष

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : अंकलेश्वर-
बऱ्हाणपूर महामार्गावर  ठीक ठिकाणी कित्येक दिवसांपासून  अत्यंत   मोठ्या प्रमाणात मोठ-मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्याचे दुरुस्ती किंवा रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे‌‌. यासाठी  बुधगाव ता. चोपडा येथील रहिवासी उर्वेश साळुंखेचे पाण्याच्या डबक्यात बसून अंघोळ करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न केला आहे. ‌सकाळी ११.४५ ते ३ वाजेपर्यंत उर्वेश साळुंखे पाण्याच्या खड्ड्यात बसून राहिले होते. अखेर साडेतीन तासानंतर रक्षा खडसे  आल्या व यांनी रस्त्याचे काम लवकर चालू होईल असे उर्वेश साळुंखे यांना शब्द देऊन आंदोलन सोडण्यास विनंती केली.[ads id="ads1"]

      अंकलेश्वर-बऱ्हाणपूर ह्या रस्त्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी आहे.‌ या रस्त्याची दुरवस्था कित्येक महिन्यांपासून अशीच आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्याला खड्डे आहेत. दररोज या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे एक्सीडेंट चे प्रमाण देखील वाढले आहे. सामान्य लोकांना अगदी मोठ्या प्रमाणात वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. यासाठी बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे यांनी साडेतीन तास पाण्याच्या डबक्यात बसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न केला आहे. [ads id="ads2"]

  साडेतीन तासानंतर रावेर लोकसभेचे खासदार रक्षाताई खडसे यांनी या आंदोलनाची सांगता करून आंदोलन करते  उर्वेस साळुंखे यांना  आंदोलन सोडण्यास विनंती केली आहे‌‌. या रस्त्याची काम लवकरात लवकर चालू होईल असा खासदार रक्षा खडसे यांनी शब्द दिला आहे. या आंदोलनाला असंख्य नागरिकांनी पाठिंबा दर्शविला होता.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️