रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
सविस्तर वृत्त असे की लोणी सिम तालुका पारोळा येथील रहिवाशी प्रहार दिव्यांग संघटना तालुका सल्लागार सुधाकर लहूभान पाटील हे दिव्यांग असून ,ते लोणी शीम येथील ग्रामपंचायत मध्ये सर्व दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के ५% निधीबाबत २०१६ च्या जीआर नुसार विचारणा करायला गेले असता, ग्रामसेवक यांना बोलले की ,गावातील घरपट्टी कर वसुली माझ्याकडून वसूल होत नाही. आणि मी निधी कसा काय देऊ तुम्हाला अशा पद्धतीने ग्रामसेवक यांनी दिव्यांग व्यक्ती सुधाकर पाटील यांना उत्तर दिले. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती घरी निघून गेले. [ads id="ads1"]
त्यानंतर ग्रामसेवक( डी के मोरे )यांचा पाच टक्के निधी मागितल्याबद्दल मनस्ताप वाढला आणि त्यांनी रात्रीच्या सुमारास ठीक नऊ वाजेला दिव्यांग व्यक्ती सुधाकर लहू भान पाटील यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली .आणि जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. फोनवरून अश्लील शिवीगाळ 'आणि धमकी याची रेकॉर्डिंग दिव्यांग व्यक्तीकडे झाली. त्यानुसार पारोळा पोलीस स्टेशन मध्ये सन 2016 च्या जीआर नुसार ,(कलम ५०७ लावून) ग्रामसेवक डी के मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. [ads id="ads2"]
पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पंधरा दिवस झाले असून ,अद्याप ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही .दिव्यांग व्यक्ती सुधाकर लहूभान पाटील .पारोळा पोलीस स्टेशन मध्ये अजून पर्यंत ग्रामसेवकावर गुन्हा का दाखल झाला नाही ,याची विचारणा करायला गेले असता, तेथील पोलीस निरीक्षक यांनी ग्रामसेवक डी के मोरे यांच्यावर अजून पर्यंत कोणतेही कार्यवाही केली नाही .असे स्पष्ट दिसून आले .(पोलीस कर्मचारी /शासकीय अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कानाडोळा जर का करत असतील तर दिव्यांग व्यक्तींना न्याय कसा मिळणार? त्यांना वाचविण्यासाठी त्यामागील रहस्य काय आहे.?असा सवाल? संतप्त दिव्यांग बांधवांकडून होत आहेत.
लोणी शीम तालुका पारोळा येथील ग्रामसेवकाच्या गैर वर्तवणूक मुळे त्यांना (कलम 507 )नुसार कठोर शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन जळगाव येथील पोलीस (अधीक्षक एम राजकुमार) यांना प्रहार संघटना व बीजेपी पक्ष रावेर यांच्या वतीने आज दिनांक 21 /11 /2023 या रोजी देण्यात आले.
त्या ठिकाणी उपस्थित रावेर तालुका प्रहारसेवक विनोद कोळी ,बीजेपी तालुकाप्रमुख रजनीकांत बारी ,बीजेपी प्रदेशाध्यक्ष संजय बुवा ,प्रहार सेवक वाल्मीक पाटील हिरापूर प्रहार सेवक सुधाकर पाटील, पारोळा इत्यादी, पदाधिकारी निवेदन देतेवेळी त्या ठिकाणी उपस्थित होते.