बोदवड तालुका शासनाने तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करावा - तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

बोदवड तालुका शासनाने तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करावा - तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी


यावल  (सुरेश पाटील) बोदवड तालुक्यातील सर्व नवीन ४ ही महसूल मंडळे तत्काळ दिवाळीच्या सुट्या संपताच दुष्काळ प्रसिध्दी यादीत जाहीर करून नव्याने प्रशासकीय चूक दुरुस्त करून या साठी शुध्दीपत्रक" काढावेच लागेल अशी मागणी बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी करून तालुक्यातील सर्व गावातील  तमाम शेतकरी बांधव आणि,प्रसिध्दी माध्यम यांचा संभ्रम दूर करावा.[ads id="ads1"]

           दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी जळगाव तहसीलदार बोदवड यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे,दि.९ नोव्हेंबर 2023 उपसमिती बैठक मंत्रालय मुंबई,CMO/ ना. मुख्यमंत्री महोदय कार्यालयातील मंत्रालय टपाल पोहचल्याचा मेसेज आला आहे...त्यावर ता. पत्र क्र.6381109/2023 सुध्दा आहे.निवेदनात बोदवड तालुक्यातील पावसाचा सलग तीन महिने ऐन परिपक्वता अवस्थेत खंड पडल्याने खरीप पीक विमा कापूस,मका, केळी पिकाला मिळालाच पाहिजे ही मागणी केली आहे.[ads id="ads2"]

जिल्ह्यात इतर २७ मंडळे पीक विमा भरपाई निकष मधे पात्र होतात त्यांना अग्रिम २५ % मदत शिंदे सरकार जाहीर करते..मग,बोदवड तालुक्यात तीन महिन्यापासून आज पर्यंत कोणत्याही गावात पाऊस पडला नाही.शिवाय बोंडअळी मुळे आहे तो कापूस देखील नुकसानीत आहे. सरकारने ही अराजकता,अन्याय थांबवला पाहिजे.आणि यंदाच्या  बोदवड तालुक्यातील खरीप २०२३ सरसकट सर्व गावांचा दुष्काळाचा रिपोर्ट शासनाने पीक विमा कंपनीला देऊन सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा भरपाई साठी पात्र अपात्र वगैरे कोणतेही निकष,बिकश न पुढे करता भरपाई सरसकट रक्कम सर्व शेतकरी यांचे खात्यात टाका.पीक विमा भरपाई मिळण्याचे निकष जसे की, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी,सलग २१ दिवस पावसाचा खंड,भूकंप,ढगफुटी आणि शेवटी दुष्काळ आहे ..) मग वाट काय बघता,उशीर कशाला करता शासन कर्त्यांनो सरसकट बोदवड तालुक्याला पीक विमा भरपाई देण्यासाठी तयार व्हा..अन्यथा, बोदवड तालुक्याच्या शेतकरी बांधवांसाठी सदैव बळीराजा के सन्मान में बोडवड राष्ट्रवादी मैदान में असा पवित्रा घेतला आहे..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते गण यांचे मार्गदर्शनात सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील प्रत्येक गावचे  सरपंच पदाधिकारी,शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरपाई मिळे पर्यंत आंदोलन करतील याची नोंद शासनाने घ्यावी.अशी मागणी आबा पाटील सह बोदवड तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव सर्व राष्ट्रवादी सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️