रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर ते पुणे (Raver To Pune) मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात आज दिनांक 18/11/2023 रोजी संध्याकाळी रावेर कडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स (Sai Siddhi Travels) प्रवाशांना घेऊन जात असताना तीने वडगाव-वाघोदा दरम्यान अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली लागलीच प्रवाशांना खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला.[ads id="ads1"]
रावेर नगरपालिकेतर्फे (Raver Municipal Corporation) कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी (Fire Bigrade) घेऊन आग विझवण्यात यशस्वी ठरले असून पुढील अनर्थ टळला आहे बस मात्र पूर्ण जळून खाक झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आप आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केल्याचे सध्या चित्रात इथं दिसून आले. तसेच काही प्रवासी हे पुणे याठिकाणी पेपर देण्यासाठी जात होते.परंतु गाडीने पेत घेतल्याने ते प्रवासी आप आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले परंतु त्यांचे गाडीत राहिलेले काही कागदपत्रे जळाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.[ads id="ads2"]
ट्रॅव्हलच्या (Travels ) अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे परंतु आरटीओ (RTO) विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. बऱ्याच जुन्या गाड्यांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे प्रवाशांमधून सूर उमटतांना दिसून येत आहे.