नायगांव येथे धम्म उपसीका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


 रावेर ग्रामीण वार्ताहर( प्रशांत गाढे) 

          नायगांव ता. मुक्ताईनगर येथे दहा दिवसीय धम्म उपसिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून त्यात 40 महिला उपसिकानी सहभाग घेतला असून दहा दिवसीय धम्म उपसिका प्रशिक्षण शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून त्या प्रशिक्षणा साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र शिक्षिका आद.मधुरीताई भालेराव असून प्रशिक्षणाचा कालावधी 7 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन आयु. रविंद्र वानखेडे हे होते.[ads id="ads1"]

 प्रमुख पाहुणे म्हणून आद.प्रा.आनंद हिवरे , आद. शेलेंद्र जाधव, आद. रविंद्र मोरे, आद.जनार्दन बोदडे,पंडित सपकाळे के. वाय.सुरवाडे,संजीव सावळे, आर.एन.पोहेकर,दिलीप पोहेकर,संजय म्हासाने हे होते.या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शाखा नायगांव व नायगांव येथील समस्त बौद्ध उपासक आणि उपासीका यांनी केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️