रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ,लोणी सीमगावातील एका गरीब कुटुंबातील दिव्यांग व्यक्ती, सुधाकर लहूबान पाटील .यांना ग्रामसेवक डी के मोरे यांनी (अश्लील शिवीगाळ )करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ,लोणी सीम या गावातील दिव्यांग व्यक्ती, सुधाकर लहूभान पाटील.हा प्रहार सेवक व्यक्ती गावातील समस्त दिव्यांग बांधवांसाठी 2016 च्या जीआर नुसार , ५%टक्के निधीवाटपाबाबत विचारणा करण्यास ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक डी के मोरे यांच्याकडे गेले होते.परंतु ,त्यांनी त्यावेळी टाळाटाळ केली. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती सुधाकर पाटील, यांना आपल्याला पाच टक्के निधी मागितल्याबद्दल त्या ग्रामसेवकाचा मनस्ताप वाढला.[ads id="ads2"]
आणि त्यांनी परत दिव्यांग व्यक्ती सुधाकर पाटील.यांना दिनांक 3 नोव्हेंबर या रोजी रात्री ठीक नऊ वाजेला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली.कापून टाकीन, मारून टाकीन, जिथे दिसेल तिथे संपवून टाकीन, अशा प्रकारच्या जीवे ठार मारण्याची धमकी दिव्यांग व्यक्ती सुधाकर पाटील.यांना ग्रामसेवक डी के मोरे यांनी दिली.या घटनेबद्दल ग्रामसेवकावर पारोळा पोलीस स्टेशन मध्ये भादवि (कलम 507) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तसेच ग्रामसेवक यांना, ( प्रहार दिव्यांग संघटना )जळगाव जिल्ह्याच्या वतीने ग्रामसेवक डी के मोरे यांना लवकरात लवकर निलंबित करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.