दिवाळीच्या सुट्टी असल्याने राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या कार अपघातात जळगाव जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्यू

 दिवाळीच्या सुट्टी असल्याने राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या  कार अपघातात जळगाव जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्यू

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  दिवाळीची सुट्टी असल्याने राजस्थानात (Rajasthan)फिरायला गेलेल्या अमळनेर तालुक्यातील मांडळ(Mandal Taluka AMALNER) येथील शिक्षकाच्या कुटुंबाच्या कारला ट्रकची समरासमोर अपघात झाला. यामध्ये शिक्षक कुटुंबासह 6 जण आघातात ठार झाले आहे.[ads id="ads1"]

अमळनेर तालुक्यातील मांडळ (Mandal Taluka AMALNER)येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे व योगेश धोंडू साळुंखे व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब अशा दोन गाड्यातून राजस्थान फिरण्यासाठी लक्ष्मीपूजन आटपून निघाले होते.

हेही वाचा:- जळगाव जिल्ह्यातील एका गावात ग्रामसेवकाची दिव्यांग व्यक्तीसोबत असभ्य वर्तवणूक ग्रामसेवकास निलंबित करून कठोर शिक्षा करण्याची जिल्ह्यातील प्रहार संघटनेकडून मागणी

राजस्थान मधील बाडमेर जैसलमेर राष्ट्रीय महामार्गावर जैसलमेर कडून जात असताना (सोमवार) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सुरतेची बेरीज जवळ ट्रक व त्‍यांच्या कारची समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात सहाजण ठार झाले आहे. धनराज नागराज सोनवणे (वय 55), सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), स्वरांजली धनराज सोनवणे (वय 4), गायत्री योगेश साळुंखे (वय 30), भाग्यश्री योगेश साळुंखे (वय 01), प्रशांत योगेश साळुंखे (वय 07) हे जागीच ठार झाले आहेत.[ads id="ads2"]

अपघात होण्यापूर्वी धनराज सोनवणे हे जे वाहन चालवत होते त्या वाहनांमध्ये योगेश साळुंखे हे त्याच्या कुटुंबासह बसलेले होते. मात्र दुसऱ्या गाडीतील दिनेश सूर्यवंशी यांनी त्यांना फोन करून वाहन चालवण्यासाठी बोलवले होते. त्यामुळे ते अपघातात सुदैवाने वाचले, मात्र या अपघातात पत्नी मुलगा मुलगी हे ठार झाले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️