25 नोव्हेंबरला मुंबई येथे जाहीर सभा संदर्भात वंचित बहुजन आघाडी तर्फे नांदगाव येथे महत्वपूर्ण बैठक



नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :---    मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्य वतीने दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान बचाव रॅली सभा होणार असून या सभेसाठी जाण्यासाठी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहणे संदर्भात दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी सोमवारी नांदगाव शहरातील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली.[ads id="ads1"]

        वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्यातर्फे संविधान बचाव रॅली दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून या रॅली सभेला जाण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भात दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी सोमवारी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहरात असलेल्या विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी बैठक मीटिंग संपन्न झाली. [ads id="ads2"]

  यावेळी या सभेला जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याची आव्हान बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️