नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

नववीत  शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील केऱ्‍हाळे (Kerhale Tal Raver Dist Jalgaon) येथील नववीत  शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजेच्या पूर्वी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. [ads id="ads1"]

  या घटनेमुळे रावेर तालुक्यातील केऱ्‍हाळे (Kerhale Tal Raver Dist Jalgaon) गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येच कारण अद्याप समजले नाही.मयत नंदिनी महाजन ही भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणारी आपली आजी निर्मला महाजन यांच्याकडे राहत होती. [ads id="ads2"]

  दरम्यान, निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात (मुलीची मुलगी) नंदिनीने गळफास घेतल्याचे दिसले.याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे

जाहिरात

 



Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️