विस्तारित कॉलनी भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वसुली..? यावल न.पा. भोंगळ कारभार

विस्तारित कॉलनी भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वसुली..? यावल न.पा. भोंगळ कारभार


यावल ( सुरेश पाटील)  यावल शहरातील विस्तारित कॉलनी भागात नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून तडवी कॉलनी भागात दहा लक्ष लिटर क्षमतेचा जल कुंभ बांधण्यात आलेला असून विस्तारित भागात वितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे. पाणी मिळण्याच्या आशेने कॉलनी भागातील लोकांनी नगरपालिकेकडे अधिकृत रक्कम भरणा करून नळ जोडणी केली आहे. नळ जोडणी घेत असताना नळ धारकांनी आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा केले नंतरच नगरपालिकेतर्फे नड जोडणी दिली जाते. मार्च 2022 पर्यंत पाईपलाईन द्वारे घेण्यात आलेल्या नळ धारकांना पाणीपुरवठा झालेला नव्हता. म्हणून अशा 328 नळ धारकांना पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये अशी मागणी विस्तारित भागातील रहिवासी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली होती. [ads id="ads1"]

  व ती मागणी मंजूर देखील करण्यात आली होती त्याप्रमाणे मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता यावल नगरपालिकेने दिलासा दिला होता. मात्र यावर्षी म्हणजे सन 2023/24च्य नगरपालिकेने पाठवण्यात आलेल्या पाणीपट्टी बिलाचे अवलोकन केले असता मागील वर्षाची थकबाकी पंधराशे रुपये व व्याज १२० रुपये असे एकूण मागील थकबाकी रक्कम 1620 रू मागील बाकी या सदराखाली आहे असे भासवून मागणी केली आहे.मागील वर्षी अतुल पाटील यांच्या मागणीनुसार चौकशी होऊन सदरची पाणीपट्टी जी नगर परिषदेने स्वरूपात घेतली होती ती समायोजित करण्याबाबत प्रशासक तथा प्रांताधिकारी श्री कैलास कडलग यांनी मान्य करून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलेला होता.असे असताना देखील नगरपरिषदेच्या कर निर्धारण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विस्तारित भागातील नळ धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.[ads id="ads2"]

            यावल नगरपालिकेने नुकतेच चालू वर्षाचे पाणीपट्टी बिलाचे वितरण विस्तारित भागातील नागरिकांना केले असून त्यामध्ये मागील वर्षाची थकबाकी या सदराखाली सोळाशे वीस रुपयाची मागणी केली.याबाबत नागरिकांनी माझ्याशी संपर्क केला असता मी आजच नगरपरिषदेला लेखी स्वरुपात निवेदन देऊन नळ धारक यांचेकडे थकबाकी नसुन नळ जोडणी करतांना न पा ने आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क घेतले आहे. तेच मागील वर्षाची पाणीपट्टी जमा झाली असुन त्याचे समायोजन करावे अशी मागणी केली आहे . समायोजन न झाल्यास जिल्हाधिकारी यांचे कडे दाद मागण्यात येईन... असे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले.

 हेही वाचा : यावल येथे चाकू हल्ला : एक गंभीर जखमी

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️