यावल शहरात डेंग्यूचा शिरकाव...?



न.पा. व तालुका आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे उपाययोजना करावी : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी

यावल (सुरेश पाटील) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डास व मच्छर यांचा उपद्रव वाढला असुन शहरातील विविध भागात डेंग्यू व मलेरीया रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत असुन नागरिकांमध्ये आरोग्य विषयक चिंता निर्माण झाली असून डेंगू सदृश्य आजाराची साथ पसरण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.म्हणून नगरपालिका प्रशासन व तालुका आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे उपाययोजना करनेसाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली आहे.  [ads id="ads1"]

              याबाबत सविस्तर वृत्त असे की,गेल्या काही संपूर्ण यावल शहरात काही दिवसांपासून डास व मच्छर यांचा उपद्रव वाढल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यू व मलेरिया आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहराच्या विविध भागांत मोकळ्या जागेवर पाण्याचे व गटारीचे डबके साचलेले असुन त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे एडीस इजिप्ती नावाचे डेंग्यू आजाराच्या अळ्या तयार होत आहे.या अळ्यांमुळे डासांची उत्पत्ती होत असुन शहरातील नागरीक डेंग्यू व मलेरिया या आजारांमुळे बाधीत होत आहे. म्हणून यावल नगरपालिकेने तालुका आरोग्य विभाग यांची मदत घेऊन घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करावे व ज्या भागांत मोकळ्या जागेत डबके साचलेले असतील ते ठिकाण माती टाकून बुजुन नष्ट करावे अशी मागणी केली जात आहे. [ads id="ads2"]                         यावल शहरातील प्रत्येक भागात जाऊन कानाकोपऱ्यात जाऊन धुरळा फवारणी करावी व गटारी वर बीएससी पावडर मारावी.नगरपालिकेने पथक तयार करून तालुका आरोग्य विभाग यांना सोबत घेऊन घरोघरी रुग्णांची तपासणी करून सर्व्हेक्षण करावे व रूग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करून मोफत औषधी उपचार करावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️