यावल (सुरेश पाटील)
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सर्व संलग्न शाखेचे सदस्य पदाधिकारी यांचे सालाबादाप्रमाणे यावर्षीही कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वार्षिक राज्य अधिवेशन दि.२३ ऑक्टोबर २०२३ सोमवार रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा सरकारी, निमसरकारी नोकरांची पतपेढीचे(ग.स.सोसायटी ) अध्यक्ष यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अधिवेशन साठी सभासदांना अधिवेशन अग्रीम रुपये ३० हजार देण्यात मंजूरी दिले.[ads id="ads1"]
त्याचे पत्र जा.क्र प्रशासन / ६०० दि.१६.१०.२०२३ अन्वये जिल्ह्यातील सर्व शाखाना तसेच आदेश पारीत केले . कास्ट्राईब संघटनेच्या सलग्न सर्व शाखेचे जळगांव ग.स.सोसायटी पतपेढीच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्याच्या शाखेशी संपर्क साधुन अग्रीम मंजूर करून घ्यावा असे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार यानी आहवान केले आहे.साधुन या संधीचा लाभ घ्यावा असे जिल्हाध्यक्ष,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगांव यांनी दिलेल्या प्रसिद्धी प्रसाद म्हटले आहे.