दिव्यांग योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे जळगाव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

दिव्यांग योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे जळगाव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन

  जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव, साधने तसेच पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.[ads id="ads1"]

  दिव्यांग व्यक्तीना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तींना तीन हजार रूपयांच्या मर्यादेत आवश्यक असणारे कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. उदा कॅलिपर, बुट, पाठीचे जॅकेट, तीन चाकी सायकल, मुकबधिरांना श्रवणयंत्रे, गरजुना चष्मे इत्यादी देण्यात येतात. यासाठी मासिक पंधराशे रूपये उत्पन्न असेल शंभर टक्के रक्कमेचा लाभ, रुपये पंधराशेच्या उत्पन्न असेल तर पन्नास टक्के रकमेचा लाभ दिला जातो ‌. यासाठी ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड,  जन्म तारखेचा दाखला, आवश्यक असणाऱ्या कृत्रिम व अवयव व साधनांचे किंमत प्रमाणपत्र आवश्यक आहे.[ads id="ads2"]

व्यवसाय प्रशिक्षीत दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय या योजनेत व्यवसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अस्थिव्यंग मुकबधीर व्यक्तींना स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शासनाकडून रुपये ५०० व काही उदयोगधंदयाबाबत रुपये १००० पर्यंत साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते. उदा. साधन सामुग्रीमध्ये शिवणयंत्र, कच्चामाल, खडू तयार करणे, मेणबत्या बनविणे, केनिंग, आर्मीचर वायडिंग, घडयाळ दुरुस्ती इत्यादी. तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनांची यादी व त्यांची किंमत अंदाजे लिहून अर्जाला जोडावी.यासाठी मासिक पंधराशे रूपये उत्पन्न असेल शंभर टक्के रकमेचा लाभ दिला जातो ‌.यासाठी ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला आवश्यक आहे.

हेही वाचा : यावल येथे चाकू हल्ला : एक गंभीर जखमी

योजनेचे अर्ज या जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून  दिव्यांग व्यक्तीना सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रायसिंग केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️