सिक्किममध्ये ढगफुटी : लष्कराचे 23 जवान बेपत्ता

सिक्किममध्ये ढगफुटी : लष्कराचे 23 जवान बेपत्ता


सिक्किममध्ये ढगफूटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्किमच्या उत्तर भागातील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं आहे.[ads id="ads1"]

मिळालेल्या माहितीनुसार, या पुरात लष्कराचे २३ जवान देखील बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पूर परिस्थितीनंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यानंतर खालच्या भागात देखील पाण्याची पातळी १५ ते २० फूटांपर्यंत वाढली. यामुळे सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने वाहून गेली. यासोबतच २३ जवान देखील बेपत्ता आहेत. या बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे.[ads id="ads2"]

सिक्किममध्ये तीस्ता नदीची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तीस्ता नदीला आलेल्या या पुरामुळे सिक्किम मधील सिंगथम फुटब्रिज देखील वाहून गेला आहे. तसेच जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे सुरू केले आहे. तसेच सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️