मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणास वंचितचा पाठिंबा



महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी विविध आंदोलन मोर्चे यांच्या माध्यमातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना आरक्षण देण्याची आग्रही मागणी करीत आहे परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील हे तीन पक्षाचे सरकार मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून याच निराशेतून अनेक मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.[ads id="ads1"]

गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेऊन अंतरवाली सराटी येथे फार मोठे आंदोलन उभे केले आहे,या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना राज्यकर्ते मात्र मराठा आरक्षणाविषयी संवेदन शून्य झाल्याचे दिसत आहे.[ads id="ads2"]

  वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या निर्दयी शासनाचा निषेध व्यक्त करीत असून आज दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी तहसील कार्यालय,भुसावळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांचे नेतृत्वात जाहीर पाठिंबा देण्यात आला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा सचिव मोहन पाटील तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव,बबन कांबळे,रुपेश साळुंखे,शुभम कदम यासह युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️