रावेरला सिडबी व युथबिल्ड फाउंडेशन आयोजित केळी चिप्स व अन्नप्रक्रिया प्रशिक्षणाचा समारोप


 केळी उद्योगाला मिळणार नवीन आकार – प्रियांका गायकवाड 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया व युथ बिल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केळी चिप्स व अन्नप्रक्रिया याबाबतचे प्रशिक्षण १ महिन्यासाठी आयोजित करण्यात आलेले होते. त्यानुषंगाने आज येथील ओमकारेश्वर महादेव मंदिर समोरील श्री देविदास शिंदे यांच्या हॉलमध्ये या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. यावेळी पाहुण्यांचा सत्कार राईज अँड शाईन कंपनीचे केळी चे रोप देवून करण्यात आला. [ads id="ads1"]

यामध्ये केळी पासून व इतर अन्न पदार्थांपासून बनविलेल्या विविध खाद्य पदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले. प्रदर्शनात २१ महिलांनी सुमारे ३० प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले होते. 

प्रशिक्षणार्थी व त्यांनी बनविलेले पदार्थ पुढील प्रमाणे.

१) सविता नारखेडे - केळीच्या पिठाची नानखटाई 

२) मंगला महाजन - केळीच्या पिठाचे लाडू 

३) सुनीता महाजन - केळीचे चॉकलेट 

४) रुक्मिणी लोहार - चीज बॉल

५) भारती महाजन - केळीची भाजी 

६) जोत्स्ना महाजन - केळीचे फुणके

७) कल्पना तेली - नानखटाई

८) संगीता गोसावी - केळीची एढणी / धिरडे 

९) स्वाती अटवालकर - केळीचे भजे 

१०) संगीता पाटील - केळीचे थालीपीठ व पापड, शंकरपाढे

११) शितल तांबे - केळीचे चॉकलेट व मिल्कशेक 

१२) राजश्री चौधरी - केळीचे गुलाबजामून 

१३) नम्रता दोडके - केळीचे लाडू

१४) ज्योती महाजन - केळी व साबुदाणा मिक्स वडा 

१५) अर्पिता गजेश्वर - बीट ची पूरी 

१६) शितल भावसार - मंचुरियन

१७) वर्षा वाणी - केळीचे भजे व मुगाचे वडे 

१८) शुभांगी लोहार - कच्च्या केळीचे वडे व मिल्कशेक 

१९) कुसुम जगताप - केळीची जेली 

२०) शितल तेली - केळीचा केक

२१) कविता गोडसे - केळीचा चिवडा व चिप्स व बर्फी

सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाचे निरीक्षण करून पदार्थांचा आस्वाद घेतला. हे प्रदर्शन व प्रशिक्षणार्थींचा उत्साह बघून सर्वच मान्यवर भारावून गेले व प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. केळीला आता नवीन सूर गवसला असून केळी आता फक्त चिप्स पुरताच मर्यादित न राहता केळीने नवीन आकार घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर केळीपासून इतर बरेच अन्न पदार्थ बनविले जावू शकता असे प्रतिपादन सिडबीच्या उपमहाप्रबंधक श्रीमती प्रियांका गायकवाड यांनी केले. [ads id="ads2"]

केळी पासून बनविलेले सर्वच अन्न पदार्थ हे अतिशय स्तुत्य असून हे कौशल्य व्यवसायात उतरवावे. यासाठी मुख्य घटक म्हणजेच केळीचे पीठ बनविण्यावर भर द्यावा. तसेच सर्व उद्योगांसाठी योद्य कागदपत्रे सादर करून शासकीय योजनाच्या माध्यमातून सेन्ट्रल बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री प्रणयकुमार झा यांनी दिली. 

उद्योग कसा करावा ? उद्योजकाचे गुण कसे असावे, उद्योजकांनी व्यवसाय करताना कुठल्या गोष्टींचे बाबींचे गांभीर्य ठेवले पाहिजे. तसेच उद्योजकामध्ये असणारे गुणधर्म याबाबत युथबिल्ड फाउंडेशन व मिमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे सहाय्यक संचालक डॉ. अमित पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी रुक्मिणी लोहार, सुनिता महाजन, वंदना पाटील, शीतल तांबे या प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. 

व्यासपीठावर सिडबीच्या उपमहाप्रबंधक प्रियांका गायकवाड, सिडबीचे छत्रपती संभाजी नगर विभागाचे प्रबंधक सीमांत पारधी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणयकुमार झा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया रावेर शाखेचे व्यवस्थापक पवन चौधरी, युथबिल्ड फाउंडेशन व मिमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे सहाय्यक संचालक डॉ. अमित पाटील, मिमाचे आतिक बिजापुरे, मिमाचे कुशल प्रशिक्षक हेमंत ठोमरे, प्रशिक्षण समन्वयक विजय पाटील होते. 

सूत्रसंचालन राजेंद्र गणवीर यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षण वर्ग प्रमुख शारदा पाटील, सहकारी एकता पाटील, रोहित पाटील यांनी सहकार्य केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️