चाळीसगांव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)अंधश्रध्दा निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनांमध्ये कार्यरत असलेले नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.गौतम निकम सौ.वैशाली निकम यांनी आपल्या मुलींचे लग्न पितृपक्षात म्हणजे दि.1 ऑक्टोंबर 2023 रोजी लावत समाजामध्ये पितृपक्षाविषयी असलेले गैरसमज व अंधश्रध्देला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला असून या आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे.[ads id="ads1"]
समाजात शुभ कार्य करण्याआधी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा कित्येक पिढ्यांपासून चालत आली आहे. लग्नासारख्या शुभ कार्यासाठी तर मुहूर्त पाहिलाच जातो. सनातनी रितिरिवाजानुसार मांगलिक मुहुर्तावर कार्य केल्यास वैवाहिक जीवन चांगल्या पद्धतीने चालतं, असं मानलं जातं. गणेशोत्सवानंतर आता पितृपक्ष सुरू झाला आहे. सनातनी धर्मातल्या रुढींनुसार पितृपक्षामध्ये शुभ कार्य केली जात नाहीत,हिंदू विवाहामध्ये तारीख ठरवत असताना मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो. अशुभ विवाह मुहूर्तावर केलेला विवाह जोडप्यावर नकारात्मक प्रभाव टाकतो, असं मानलं जातं, त्यामुळे विवाह शुभ मुहूर्त पाहून केला जातो. लग्नाआधी वर आणि वधूची कुंडली पाहिली जाते, त्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरवला जातो.परंतु चाळीसगांव येथील निकम आणि जामखेड येथील जावळे कुटुंबियांनी या सर्व अंधश्रध्देेला सोडचिठ्ठी देत पितृपक्षात मंगल परिणय देखील मूर्हूत न बघता दुपारी 13.30 मिनिटांनी लावले.[ads id="ads2"]
या विवाहबाबत अधिक माहिती देतांना प्रा.गौतम निकम यांनी सांगितले की,समाज प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्था चालवित असतांना आम्ही सर्व सहकार्यांनी भुसावळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात दि.12 जानेवारी 2014 रोजी झालेल्या बैठकीत विवाह संदर्भात ठराव करत पितृपक्ष व कोणतेही शुभे मूर्हूत न बघता विवाह लावण्याचा ठराव सर्वनुमते केला होता आज त्या ठरावाची अंमलबजावणी स्वताच्या मुलीच्या लग्नात होत असल्याने प्रचंड आनंद होत आहे.त्या ठरावानुसार हया लग्नात आम्ही हुंडा दिला नाही,हळदी कार्यक्रम घेतला नाही,डिजेे बॅड फटाक्यांची आतिषबाजी न करता तसेच मिरवणूक न काढता स्वागत समारंभावर कोणताही खर्च न करता रूढी पंरपरेनुसार चालत असलेल्या रिती रिवाज टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच या विवाह समारंभात कष्टककरी नागरिकांना मुख्य अतिथींचा मान देत मानवता धर्माचे पालन करण्यात आले.विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व मित्रपरिवार ,नातेवाईक व हितचिंतकांना तसेच वराकडील पाहुण्यांना देखील भारतीय संविधान प्रास्ताविका,लोककल्याणकारी राजा सयाजीराव गायकवाड,बहुजनांचे महानायक ,क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे,सीएए,एनआरसी,एनपीआर , बुध्द आणि त्यांचा धम्म, महामाता,माझी आत्मकथा डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी पुस्तके सस्नेह भेट म्हणून देण्यात आली.या आदर्श लग्नाला राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित या आदर्श विवाहबद्दल निकम कुटुंब व जावळे कुटुंबियांचे कौतुक केले.