महसूल,पोलीस,आरटीओ यांच्या नाकावर टिचून परराज्यातील चोरीचे,बेकायदा जेसीबी मशीन यावल शहरात..?उद्योग धंद्यांमध्ये जोरदार चर्चा

 


यावल  ( सुरेश पाटील ) परराज्यातील चोरीचे जेसीबी मशीनचे बोगस,बनावट कागदपत्रे दस्तऐवज तयार करून यावल महसूल पोलीस आणि जळगाव आरटीओ विभागाची शुद्ध फसवणूक दिशाभूल करीत आणि त्यांच्या नाकावर टिचून बेकायदा उद्योग सुरू असल्याचे बांधकाम क्षेत्र संबंधित उद्योग,धंदे करणाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads1"]

    यावल शहरात परराज्यातील चोरीचे जेसीबी मशीन आणून संबंधित व जळगाव आरटीओ यांच्याकडे पासिंग करून ( मूळ जेसीबी मशीनच्या चेसिस नंबरची खात्री न करता पासिंग झाल्याने )तसेच यावल महसूल पोलीस आणि जळगाव आरटीओ यांच्या नाकावर टिचून त्या चोरीच्या बोगस जेसीबी मशीनद्वारा उद्योग धंदा जोरात सुरू आहे त्या जेसीबी मशीनचे कागदपत्रांचा आणि चेसेस नंबरचा शोध व चौकशी यावल पोलीस आणि आरटीओ यांनी केल्यास यावल तालुक्यात जेसीबी मशीन सुद्धा चोरीचे असल्याचे निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही.[ads id="ads2"]

        सर्वपित्री अमावस्येला बेकायदा वाहनधारकांचे चोरट्यांचे यावल पोलिसांकडून कायदेशीर श्राद्ध. २० ते २५ संशयीत ताब्यात,खळबळ आणि पोलिसांचे कौतुक. वाहन चोरी करून एजंट मार्फत विक्रीचा उद्योग उघडकीस. एका ट्रॅक्टरचा शोध घ्यायला गेले आणि मिळाली संपूर्ण टोळी.ट्रॅक्टर सह १३ मोटरसायकली पोलिसांकडून हस्तगत.दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश याबाबत यावल पो.स्टे.ला संशयीतान विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि सदरचे वृत्त संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्या त वाऱ्यासारखे पसरल्याने यावल पोलीस स्टेशन व महसूल कार्यालयापासून ५ किलोमीटर अंतराचे आत परराज्यातील चोरीचे जेसीबी मशीनचा उद्योग धंदा आपल्या बेकायदा अनधिकृत उद्योगातून दिवस-रात्र सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा :- तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....

       याबाबत यावल पोलीस व महसूल विभागाने त्या जेसीबी मशीनसह इतर आवश्यक सर्व वाहनांच्या कागदपत्रांची व त्यांच्या च्यासिस नंबरची आरटीओ विभागामार्फत प्रत्यक्ष खात्री केली केल्यास चोरीचे व बनावट कागदपत्र दस्तऐवज सादर करून शासनाची दिशाभूल करण्याचा मोठा उद्योग समोर आल्याशिवाय राहणार नाही असे बांधकाम क्षेत्र व्यवसायिकांमध्ये बोलले जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️