यावल ( सुरेश पाटील)
निविदा प्रक्रिया सन २०२३-२४ रद्द करणेबाबत यावल येथील मनोज रामदास करणकर यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.9 ऑक्टोंबर 2023 लेखी तक्रार केली.[ads id="ads1"]
दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी नमूद केली आहे की सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना ई निविदा सन २०२३-२४ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना,नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना२०२३-२४ या सर्व ई निविदा यावल न.पा.मार्फत करण्यात आलेल्या आहेत.यावल नगरपरिषदेने या निविदा काढताना ई निविदा प्रक्रिया सन२०२३-२४ राबवितांना नियमबाह्य अटी, शर्ती टाकून एकाच व मर्जीतल्या ठेकेदारास काम मिळुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे, तरी यावल शहरात गणपती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजीत रक्कम २० लाख २ हजार ६१२ रुपये तसेच (इतर कामांची निविदा वेग वेगळी ) सुतार वाडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे या व इतर कामांसाठी डांबरीकरण प्लन्टची अट व शर्ती टाकुन नियमबाह्य ई निविदा नगरपरिषद यावल राबवित आहे.[ads id="ads2"]
तसेच शासन निर्णयानुसार सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांच्यासाठी निविदा सुचना मध्ये ४०% कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंतांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असतांना तसे न करता निविदाप्रकिया संबंधित यावल नगरपालिका अधिकारी राबवित आहे जेणे करुन मर्जीतले ठेकेदार यांना काम मिळवुन देण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे गरजू व सुशिक्षित सुशिक्षित अभियंते व इतर ठेकेदारांवर अन्याय केला आहे.तरी कृपया सदरची ई निविदा सन २०२३-२४ प्रक्रिया हि पारदर्शक नसुन ती निविदा रद्द करण्यात यावी अशी विनंती वजा तक्रार मनोज करणकर यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.