रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील रहिवासी किशोर बाबुलाल जैन वय 42 यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आली आहे. त्याने तणावातून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांमधून बोलले जात आहे. [ads id="ads1"]
त्याच्या नातेवाईकांचा रावेर ग्रामीण रूग्णालयात (Raver Rural Hospital) एकच अक्रोश केल्याचे पहायला मिळाले. किशोर जैन रा. रथगल्ली रावेर ता . रावेर जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.[ads id="ads2"]
किशोर जैन हा तरूण आपल्या परिवारासह राहत होता. राहत्या घरात कुणीही नसतांना त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तो कोणत्यातरी तणावात होता.याबाबत रावेर पोलीस स्टेशनला(Raver Police Station) कैलास सैतवाल यांनी दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते